नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कामळज येथील माजी सरपंच पितापुत्र व त्यांचा भाऊ,पुतण्यावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला आहे. तलवार रॉडने केलेल्या  या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


 ही घटना आज दुपारी चारच्या दरम्यान घडलीय. दरम्यान उस्माननगर पोलिस ठाण्यात बारा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उस्माननगर पोलीसांनी दिलीय. पोलीस सूत्रांकडून दिलेल्या माहितीवरून कामळज येथे वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर मोठया प्रमाणात धूळ उडून पिकांचे नुकसान होत असल्यााची तक्रार शेतकऱ्यांनी, लोहा  तहसीलदार व कंधार विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, कामळज नदीपात्रातून तरफ्याच्या साहाय्याने राजरोसपणे वाळू उपसा सुरू होते.त्यामुळे शेतकरी पांडुरंग बालाजी भरकडे, मारुती संभाजी भरकडे, बळीराम संभाजी भरकडे या बागायतदार शेतकऱ्यांनी सदर वाळू उपसा करणाऱ्यांना रस्त्यावर पाणी टाकून वाळूची वाहतूक करा, ज्यामुळे पिकांचे नुकसान होणार नाही अशी विनंती केली होती.


 दरम्यान हे सांगूनही भरधाव वेगाने ट्रक वाहतूक होत असल्याने शेतकऱ्यांनी यास विरोध केला. विरोध केल्यानंतर वाळू माफियांकडून या शेतक-यांना गैर कायद्याची मंडळी जमवून पाठलाग करुन लोखंडी रॉड, कु-हाड, लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये माजी सरपंच बळीराम भरकडे त्यांचे भाऊ मारुती भरकडे व पुतन्या पांडुरंग भरकडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीरावर व डोक्याला जबर दुखापत झाल्याने नांदेड येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


संबंधित बातम्या :