ठाणेकरांसाठी खुशखबर | वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी LRT चा प्रस्ताव
ठाण्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याअंतर्गत ठाण्यात 26 किमी उन्नत मार्ग आणि 3 किमी भुयारी मार्गाची लाईट मेट्रो धावणार आहे.
ठाण्यातील अंतर्गत रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ठाणेकरांसाठी मोठा मनस्ताप झालेली आहे. तेव्हा त्या वाहतूक कोंडीला दूर करण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेने एक प्रस्ताव तया केला आहे. लाईट हरबल रेल्वे ट्रान्सलेट हा नवा वाहतुकीचा पर्याय महापालिका ठाणेकरांना देऊ पाहते.
"अंतर्गत मुख्य मेट्रोला परवानगी न मिळाल्याने आम्ही हा प्रस्ताव तयार केला असून त्याला महासभेत मंजुरी मिळेल. या मेट्रोसाठी ठाणे महानगरपालिका पाच टक्के राज्य सरकार पंधरा टक्के तर केंद्र सरकार कडून 20 टक्के अर्थसाह्य घेण्यात येणार आहे. उरलेले 60 टक्के आम्ही कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या संस्थांकडून येणार आहोत", असे ठाण्याची महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.
एकूण 7 हजार 65 कोटींचा हा प्रकल्प ठाणेकरांचा भविष्य बदलू शकेल. मात्र त्यासाठी आधी एल आर टी आणि मेट्रो या दोघांमध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.
वाहतूक व्यवस्था तज्ज्ञ विवेक यांच्या मते, "लाईट अर्बन रेल्वे ट्रान्झिट हे जगातील अनेक देशांमध्ये सध्या कार्यरत आहेत. पेट्रोल एक चांगला पर्याय म्हणून हे प्रकल्प उपयोगी ठरतात. तसेच ज्यांचा खर्चदेखील कमी असल्याने ठाणे सारख्या शहराल हा प्रकल्प उपयोगी ठरेल."
ठाणे शहरामध्ये पहिल्यांदा एलआरटी राबवण्याचे निश्चित झाले होते. परंतु २०१६ मध्ये नव्याने अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो राबवण्याचा हट्ट धरण्यात आला. परंतु केंद्राच्या सुचनेनंतर महापालिकेस पुन्हा एलआरटीचा प्रस्ताव तयार करण्याची वेळ आली आहे. महामेट्रोकडून पुर्वीच्या प्रस्तावित रेखांकनामध्ये बदल न करता नवा ‘एलआरटी’ अहवाल तयार करण्यात आला आहे.
सदर प्रकल्प मुळे ठाणेकरांना खूप फायदा होणार आहे. ठाणे स्टेशनला जाण्यासाठी आणि नवीन होणाऱ्या स्टेशनला जाण्यासाठी देखील लाईट मेट्रो हाच पर्याय असेल. असे ठाणे महानगरपालिकेचे उपमुख्य अभियंता प्रफुल्ल पापळकर यांनी सांगितले.
लाईट मेट्रोची वैशिठ्ये
या प्रकल्पासाठी ७ हजार १६५ कोटींचा खर्च येणार आहे.
या प्रकल्पाचे रेखांकन डीपी रोडवर असल्याने भुसंपादनाचा १ हजार ५२७ कोटींचा खर्च वाचणार आहे.
नव्या ठाणे ते नवी ठाणे असा २९ किमी उन्नत मार्गावरून ही लाईट मेट्रो धावणार असून ३ किमी भुयारी मार्ग तर २६ किमी उन्नत मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
२०२५ मध्ये प्रतितास २३ हजार ३२० प्रवाशी संख्येचा अंदाज नियोजित आहे.
३ कार रेल व त्यानंतर प्रावासी वाहतुकीच्या प्रमाणे ६ कार रेल डब्यांची संख्या वाढवण्यात येईल.
उच्चतम प्रवासी वाहतुक क्षमता प्रती तास १२ हजार ७०३ इतकी असणार आहे. ८० किमी प्रतितास वेगाने ही सेवा धावू शकते.
संपूर्ण ठाण्यातील अंतर्गत रस्त्यावर ही लाईट मेट्रो धावणार असल्याने, रिक्षा, बस आणि रस्त्यावरील वाहनांच्या कोंडीतून देखील ठाणेकरांची सुटका होऊ शकेल.तसेच मुख्य मेट्रो प्रणमे सर्व सुविधा या प्रकल्पातून देण्याचा विचार पालिकेचा आहे. हा प्रकल्प झाल्यास ठाणे महापालिका महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका असेल जी एलआरटीचा पर्याय नागरिकांना देईल. मात्र हा प्रकल्प लालफितीच्या कारभारात अडकू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.