एक्स्प्लोर
मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून हॉटेल मालकाला बेदम चोप, मारहाणीचं फेसबुक लाईव्ह
विरारमध्ये राजू शेट्टी नावाच्या हॉटेल चालकाने कॅन्सर पीडित रुग्णाला लाखोचा गंडा घातल्याचा आरोप आहे.
विरार/ठाणे : विरारमध्ये एका रुग्णाची फसवणूक करणाऱ्या हॉटेल चालकाला मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे हॉटेल चालकाला बदडताना अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह केलं.
विरारमध्ये राजू शेट्टी नावाच्या हॉटेल चालकाने कॅन्सर पीडित रुग्णाला लाखोचा गंडा घातल्याचा आरोप आहे. यासंदर्भात फसवणूक झालेल्या रुग्णाने मनसे ठाणे जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला. यानंतर अविनाश जाधव यांनी काल (12 फेब्रुवारी) रात्री राजू शेट्टीला गाठलं आणि त्याला बेदम चोपलं.
महत्त्वाची बाब म्हणजे हॉटेल चालकाला मारताना अविनाश जाधवांनी फेसबुक लाईव्ह केलं. शिवाय, आम्ही या रुग्णाला न्याय मिळून देणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बीड
Advertisement