एक्स्प्लोर
ठाण्यात दुहेरी हत्याकांड, ज्येष्ठ नागरिकासह नोकराची निर्घृण हत्या
ठाणे : ठाण्यात दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने ब्रम्हांड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घोडबंदर रोडजवळील ब्रम्हांड येथे असणाऱ्या रिजन्सी हाईट्स या सोसाटीतील एका ज्येष्ठ नागरिकासह नोकराची हत्या करण्यात आली आहे.
70 वर्षीय सीताराम श्रॉफ यांच्या तोडावर उशी ठेवून त्यांचा जीव घेण्यात आला, तर संतोष यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
दुहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement