एक्स्प्लोर
सरोगेट मदरवर लैंगिक अत्याचार, ठाण्यात डॉक्टरला बेड्या
सरोगसीद्वारे प्रेग्नंट झालेली तरुणी उपचारासाठी ठाण्याच्या नौपाडा परिसरातील निर्मिती रुग्णालयात गेली होती. तिथे डॉ. प्रतीक तांबे यांनी तपासणीच्या नावाखाली लैंगिक चाळे केल्याचा आरोप तिने केला

ठाणे : सरोगसी मातेची वैद्यकीय तपासणी करण्याच्या बहाण्यानं लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला ठाण्यात अटक करण्यात आली आहे. प्रतीक तांबे असं आरोपी डॉक्टरांचं नाव असून मुंबईत राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने त्यांच्यावर आरोप केले आहेत. सरोगसीद्वारे प्रेग्नंट झालेली तरुणी उपचारासाठी ठाण्याच्या नौपाडा परिसरातील निर्मिती रुग्णालयात गेली होती. तिथे डॉ. प्रतीक तांबे यांनी तपासणीच्या नावाखाली लैंगिक चाळे केल्याचा आरोप तिने केला. विरोध केला असता तोंड दाबून लैंगिक अत्याचार केल्याचंही तिने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर डॉ. तांबेंना अटक करण्यात आली आहे. कोर्टाने आरोपी डॉक्टरांना 22 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 1 अधिक तपास करत आहे.
Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?






















