एक्स्प्लोर
उपचाराच्या नावे बलात्कार, ठाण्यात क्रिस्टल थेरपिस्टला अटक
पीडिता आईसोबत नाईक यांच्या घरी उपचारासाठी गेली. मात्र आईला कामामुळे लवकर निघावं लागलं

ठाणे : प्रख्यात फेंगशुई मास्टर आणि क्रिस्टल थेरपिस्ट चारुहास नाईक यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. क्रिस्टल थेरपीच्या नावाखाली वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप नाईक यांच्यावर आहे. तरुणी डिप्रेशनच्या उपचारासाठी चारुहास नाईक यांच्याकडे क्रिस्टल थेरपी घेत होती. ठाण्यातील घोडबंदर रोडवर थेरपिस्ट चारुहास नाईक यांचा फ्लॅट आहे. पीडिता आईसोबत नाईक यांच्या घरी उपचारासाठी गेली. मात्र आईला कामामुळे लवकर निघावं लागलं. थेरपीनंतर तरुणीला घरी सोडण्याचं नाईक यांनी पीडितेच्या आईला सांगितलं. नाईक यांनी थेरपीनंतर तरुणीला घरी आणून सोडलं. मात्र क्रिस्टल थेरपीच्या नावाखाली तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचा आरोप आहे. पीडित तरुणी मुलुंडमध्ये राहते. तिचे वडील सीए असून आई शास्त्रज्ञ आहे. नाईक यांना ठाणे न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























