ऑक्सिजनसाठी होणारी रूग्णांची परवड थांबली; ठाणे जिल्हा रुग्णालयाची खास व्यवस्था
ठाणे जिल्हा रुग्णालयाला आता ऑक्सिजनसाठी अबलंबून राहण्याची गरज भासणार नाही. कारण रुग्णालाने आता 10 हजार आणि 6 हजार किलो लीटरच्या लिक्विड ॲाक्सिजन असलेल्या टाक्यांची यंत्रणा उभी केली आहे. यामुळे ऑक्सिजनसाठी होणारी रुग्णांची परवड थांबली आहे.
ठाणे : सध्या सर्वात जास्त गरज ही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची आहे. ॲाक्सिजनच्या कमतरतेमुळे या कोविड काळात अनेक कोरोना बाधित रुग्णांचे हाल झाले आहेत. काही ठिकाणी तर रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. पण आता निदान ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात तरी ॲाक्सिजनमुळे रुग्णांचे हाल होणार नाही. कारण ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांकरता ॲाक्सिजनची कायम स्वरुपी सोय करण्यात आली आहे. ठाणे सिव्हील हॉस्पिटलने 100 - 200 लीटर नाही तर तब्बल 10 हजार आणि 6 हजार किलो लीटरच्या त्या ही लिक्विड ॲाक्सिजन असलेल्या टाक्यांची यंत्रणा उभी केलीये. ज्यामुळे सिव्हील हॉस्पिटल मधील एकाही रुग्णाला आता ॲाक्सिजनची कमतरता भासणार नाही.
ठाणे जिल्ह्यातील अव्याहतपणे ऑक्सीजन पुरवणारी ही पहिलीच यंत्रणा आहे. प्रत्येक डोळ्यात ऑक्सिजन युक्त असे बेड्स मर्यादित असतात. कारण रुग्णांना देण्यात येणारे ऑक्सिजन हे लहान मोठ्या सिलेंडर मधून विकत घ्यावे लागतात. महिन्याला असे हजारो सिलेंडर आणून रुग्णांना ऑक्सिजन पुरवावा लागतो. मात्र सध्या सर्वत्र अशा ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात एक कायमस्वरूपी यंत्रणा असावी, असे रुग्णालयाच्या प्रशासनाला वाटले. त्यामुळेच लिक्विड ऑक्सिजन असलेली एक भली मोठी यंत्रणा याठिकाणी बनवण्यात येत आहे. तिचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी एबीपी माझला सांगितले.
सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात केवळ दोनशे बेडचे कोविड रुग्णालय असून येणाऱ्या काळात याच ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यावेळी पाचशेपेक्षा जास्त बेड्सचे हे रुग्णालय होईल. असे असले तरी त्या 500 बेडला ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता या नवीन यंत्रणेत आहे. तसेच या दोन्ही टाक्यांमधील ॲाक्सिजन पातळी कमी झाल्यास ही यंत्रणा बनवलेल्या कंपनीला सूचना जाईल आणि ऑक्सिजन रिफिल करणारे येवून लिक्विड ऑक्सिजन पुन्हा भरून जातील, अशी ही अद्यावत यंत्रणा आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी सांगितले. ही यंत्रणा सुरु झाल्यानंतर ठाणे जिल्हा रुग्णालय ऑक्सिजनच्या बाबतीत तरी आत्मनिर्भर होईल यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
कोरोनाविरुद्ध लढा निर्णायक वळणावर, आजही मास्क हीच आपल्यासाठी लस : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे