एक्स्प्लोर

ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय भालेराव यांना अटक

ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय भालेराव यांनी 22 कोटी आणि 31 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अनुक्रमे एस. डी. भालेराव कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार विजय अग्रवाल आणि अक्षय रुईया यांनी केली आहे.

ठाणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय भालेराव यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भालेरावांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार आल्यानंतर ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली. त्यांची सर्व बँक खाती, मालमत्ता जप्त करण्याचे काम पोलिस करत आहेत. एस. डी. भालेराव कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार विजय अग्रवाल आणि अक्षय रुईया यांच्या तक्रारीवरुन हे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 22 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अग्रवाल आणि 31 कोटी रुपये दिले नाहीत म्हणून रुईया यांनी भालेराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय भालेराव यांच्या एस डी भालेराव कन्स्ट्रक्शन कंपनीने गेल्या 20 वर्षात मोठी झेप घेत अनेक बांधकाम प्रकल्प हाती घेतले होते आणि ते पूर्णही केले. व्हीजेटीआयमधील इंजिनिअर असलेल्या भालेराव यांनी 1991 मध्ये एस.डी. भालेराव कन्स्ट्रक्शन कंपनी सुरु केली. सुरुवातीला बीबीटीपी, सिडको, रेल्वेची कामं करणाऱ्या भालेराव यांनी 1999 मध्ये आपली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली. बँकेची नोकरी सोडून त्यांची पत्नीही कंपनीत भागीदार झाली. ठाणे, कुर्ला, अंधेरी, पिंपरी, मुलुंड अशा ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्प उभारले. सुमारे 32 प्रकल्पांच्या माध्यमातून गृहनिर्माण उद्योगात नाव कमावले होते. ठाण्यातील वर्तकनगर येथील म्हाडा कॉलनीतील काही जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि त्यांना उतरती कळा लागली. भालेराव यांनी 100 कोटींच कर्ज काढून हाती घेतलेल्या प्रकल्पाला मंजुरीच न मिळाल्याने त्यांचा प्रकल्प रखडला आणि बँक, गुंतवणूकदार यांनी त्यांच्याकडे पैसे वसुलीसाठी तगादा लावला. बँक ऑफ इंडियाने तर एक इमारत जप्त करुन साडेसात कोटींची वसुली केली. अशाप्रकारे गुंतवणूकदारांच्या रकमा वाढू लागल्या. त्यातून एक मालमत्ता विकून दुसर्‍यांचे कर्ज फेडण्याची साखळी सुरु झाली आणि त्या साखळीत भालेराव अडकले. विजय अग्रवाल यांनी 22 कोटी आणि अक्षय रुईया यांनी 31 कोटी रुपये गुंतवले होते. त्याच्या मोबदल्यात काही फ्लॅट हे मॉर्गेज ठेवण्यात आले. या दोघांनाही ठरल्याप्रमाणे व्याजही मिळणे बंद झाल्यानंतर मॉर्गेज प्रॉपर्टीची माहिती घेतली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ती मालमत्ता अन्य व्यक्तीला देण्यात आली होती. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर दोन्ही फिर्यादींनी भालेराव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अजून तपास सुरु आहे. भालेराव यांनी आणखी कोणाकडून पैसे घेतलेत, याची चौकशी करुन त्यांचं बँक अकाऊंट आणि मालमत्ता सील करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. तसेच अशा पैशांच्या व्यवहारात पडताना काळजी घेण्याचं आवाहनही पोलिसांनी  केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Shivsena Name And Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Embed widget