एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचं पत्र सापडल्यानं खळबळ
मुंबई विमानतळावरील शौचालयात एक पत्र सापडलं असून यामध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई विमानतळावरील शौचालयात एक पत्र सापडलं असून यामध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षता म्हणून येथील कार्गो टर्मिनल रिकामं करण्यात आलं आहे.
थोड्या वेळापूर्वीच विमानतळावरील एका शौचालयात हे पत्र सापडलं असून यामध्ये 26 जानेवारी 2018 ला कार्गो टर्मिनलवर दहशतवादी हल्ला होणार असं लिहलं आहे. हा हल्ला आयसिस किंवा इतर दहशतवादी करु शकतात. असंही या पत्रात नमूद करण्यात आलं.
दरम्यान, हे पत्र सापडताच पोलिसांनी आणि बॉम्ब पथकानं कार्गो टर्मिनल रिकामं केलं आहे. सध्या प्रवाशांची पूर्ण तपासणी करुनच त्यांना विमानतळावर सोडण्यात येत आहे. अद्यापही सर्च ऑपरेशन सुरुच आहे. मात्र, असं असलं तरीही विमानाच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ कार्गो टर्मिनल खाली करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement