एक्स्प्लोर

एक तपानंतर कलानी कुटुंबाकडे उल्हासनगरचं महापौरपद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम ओमी कलानी यांना महापौरपद देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात महापालिकेवर भाजपाची सत्ता आल्यानंतरही टीम ओमी कलानीने कुठल्याही पदावर दावा केला नव्हता. मा

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर मीना आयलानी यांनी अखेर सभागृहात राजीनामा सुपूर्द केला. आयलानी यांचा महापौरपदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपुष्टात आला. त्यानंतर टीम ओमी कलानीला महापौरपदासाठी भाजप आणि साई पक्षाकडून आश्वासन मिळूनही त्या दोन महिन्यांपासून राजीनामा देण्यासाठी टोलवाटोलवी करत होत्या. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महासभेत महापौर मीना आयलानी यांनी आपला पदाचा राजीनामा आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे तब्बल एक तपानंतर पुन्हा कलानी कुटुंबाकडे महापौरपद येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत, माजी आमदार पप्पू कलानी यांचा मुलगा ओम कलानी यांनी टीम ओमी कलानी हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यांनी भाजपच्या तिकीटावर आपले उमेदवार निवडून आणले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम ओमी कलानी यांना महापौरपद देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात महापालिकेवर भाजपाची सत्ता आल्यानंतरही टीम ओमी कलानीने कुठल्याही पदावर दावा केला नव्हता. मात्र महापौर मीना आयलानी यांचा जुलै महिन्यात महापौरपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर टीम ओमी कलानीने महापौरपदासाठी हालचाली सुरु केल्या. एक तपानंतर कलानी कुटुंबाकडे उल्हासनगरचं महापौरपद मात्र टीम ओमी कलानीला महापौरपद मिळू नये यासाठी भाजप आणि कट्टर विरोधक साई पक्षाने राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली होती. तसंच याबाबत नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर भाजपनेच पत्रकार परिषद घेत, मीना आयलानी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही दोन महिन्यांचा काळानंतरही टीम ओमी कलानीला महापौरपद देण्याला भाजपा आणि साई पक्षाचा विरोध कायम होता. एक तपानंतर कलानी कुटुंबाकडे उल्हासनगरचं महापौरपद अखेर या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत, टीम ओमी कलानीला महापौरपदाचा शब्द दिल्याचं सांगत, महापौर मीना आयलानी यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी पार पडलेल्या महासभा संपताच महापौर मीना आयलानी यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी त्या भावूक होत सर्व नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पुढील महापौरपदाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, पंचम कलानी यांची वर्णी महापौरपदावर लागणार असल्याचं निश्चित झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mohan Bhagwat : संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Embed widget