एक्स्प्लोर

गरज पडल्यास शिक्षकांना आठवड्यातून दोनदा शाळेत बोलवणार, शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना जारी

एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षकांनी विरोध करत प्रवासाची सोय नसल्याने शाळेत उपस्थित राहणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबई : राज्याचं शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरु झालं. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये काम सुरु करण्याची तयारी व ई लर्निंगबाबत मुख्याध्यापकांनी आठवड्यातून गरज पडल्यास दोन दिवस बोलवल्यास शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. यासंदर्भातील शिक्षण विभागाने नवे परिपत्रक जारी केले आहे. राज्यात कोरोना (कोविड-19) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण व शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याबाबत 15 जून 2020 शासन निर्णयान्वये घेतला आहे. यामध्ये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शाळा पूर्व तयारीच्या 15 दिवसांमध्ये कोणती कार्यवाही करावी, यामध्ये सष्ट केले आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थित राहण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतील. ही बाब विचारात घेता शिक्षकांसाठी वर्क फ्रॉम होमची सवलत दिली असली तरी शाळा सुरू करण्याची तयारी व ई लर्निंगबाबत मुख्याध्यापकांनी आठवड्यातून दोन दिवस बोलवल्यास उपस्थित राहावे, अस सांगण्यात आलं आहे.

ज्या शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती अत्यावश्यक असेल अशा शिक्षकांना शाळेमध्ये बोलवण्याबाबत मुख्याध्यापकांनी/शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. शिक्षकांना शक्यतो आठवड्यामध्ये एक किंवा दोन दिवसापेक्षा जास्त वेळा बोलवू नये. तसेच एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षकांनी विरोध करीत प्रवासाची सोय नसल्याने शाळेत उपस्थित राहणार कसे असे म्हटले आहे. ज्या शिक्षकांच्या सेवा कोविड आजारा संबंधित कामकाजासाठी दिल्या आहेत, त्या शिक्षकांना त्या कामातून कार्यमुक्त करण्याबाबत शिक्षणाधिकारी कार्यवाही करावी. त्यांच्याबरोबर समायोजित सरप्लस शिक्षकांनाही मूळ शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घ्यावा. शाळा क्वॉरंटाईनसाठी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. त्या शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येईपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलावू नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.

महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, रक्त दाब, हृदयविकार इत्यादी सारखे गंभीर आजार असलेले व 55 वर्षावरील पुरुष शिक्षकांना शाळेमध्ये न बोलवता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरु होण्याच्या कालावधीपर्यंत तात्पुरती वर्क फ्रॉम होमची सवलत असेल. मात्र, यावर आठवड्यातून एक दिवस शाळेत उपस्थित राहून इतर दिवशी घरूनच वर्क फ्रॉम करण्याचे आदेश शिक्षण उपसचिवांनी काढले असले तरी एक दिवस शाळेत कसे जावे व कशासाठी जावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत शिक्षकांना वर्क फ्रॉम होमच करू द्यावे, असं मत मुंबई भाजप शिक्षक सेल संयोजक अनिल बोरणारे यांनी मांडले आहे.

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
Embed widget