एक्स्प्लोर

खासगी विनाअनुदानित शाळांची शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास टाळाटाळ!

राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांचे व्यवस्थापन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास टाळाटाळ करत आहे. याची गंभीर दखल शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे.

मुंबई : राज्यभरातील सर्व शाळा, कॉलेज या 23 मार्च पासून बंद आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना नियमित वेतन देण्यास शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे खासगी विनाअनुदानित शाळातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनाची जबाबदारी ही त्या शाळा व्यवस्थापनाची असून त्यांनी त्याप्रमाणे नियोजन सुरू करून त्यांचे वेतन लवकरात लवकर अदा करावे, असे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.

मागील काही महिन्यांपासून खासगी विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार हे रखडले गेले होते. याबाबत अनेक शाळांनी शासनाला जबाबदार धरल्याने गैरसमज निर्माण झाल्याचं या परिपत्रकात नमूद केलं आहे. खासगी विनाअनुदानित शाळांची जबाबदारी व त्या शाळातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या बाबतची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापनाने स्वतः घेण्यास सांगितले आहे.

15 जूनपासून शाळा ऑनलाईन सुरु होणार, शिक्षण आयुक्तांची माहिती 

महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती नियमावली खासगी विनाअनुदानित शाळांनाही लागू आहे. त्यामुळे या शाळांमधील वेतन, भत्ते सेवानिवृत्तीनंतरचे व इतर लाभ विहित केलेल्या लाभाप्रमाणे देणे अपेक्षित आहे. मात्र, काही शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कमी वेतन आणि लाभ देत असल्याच्या तक्रारीही शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. याबाबतही सर्व शाळांना सूचना देण्याचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शिक्षण संचालकांना दिले आहेत. नियमित वेतन न देणाऱ्या तसंच कमी वेतन आणि कमी लाभ देणार्‍या किंवा वेतन देण्यास कुचराई केल्यास शाळांची मान्यता रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शासनाने लवकरात लवकर पगार द्यावे : जी नाईक तर कोरोनाच्या काळात मागील 60 दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये खासगी विनाअनुदानित शिक्षकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न या शाळातील शिक्षकांसमोर आहे. त्यामुळे '13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार 20 टक्के अनुदान एप्रिल 2019 पासून खासगी विनानुदानित शाळा, कॉलेजला देण्याबाबत निर्णय झालेला असताना हे निर्देश देऊन संस्थाचालकांना पगार द्या असे सांगणे हे एकप्रकारे धूळफेक असून शासनाने लवकरात लवकर पगार द्यावे', असे कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती अध्यक्ष तानाजी नाईक यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या काळात प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षणाचं भविष्य काय? माझा शिक्षण परिषद #Education

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2026 | शनिवार
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 
अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण
अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..
Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांचं प्रदेशाध्यक्ष पद राहणार की जाणार? देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
KKR ला आणखी एक धक्का, हर्षित राणानंतर आणखी एक वेगवान गोलंदाज IPL बाहेर, दुसरीकडे पथिराना श्रीलंका बोर्डामुळं अडकला
कोलकाता नाईट रायडर्सला आणखी एक धक्का, हर्षित राणानंतर आणखी एक वेगवान गोलंदाज IPL बाहेर
रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
भाईजान सलमानकडून ईदच्या शुभेच्छा, सलीम खानही सोबतीला; राज ठाकरे आमीर खानच्या घरी

Embed widget