एक्स्प्लोर
राज्यमंत्री रविंद्र वायकरांच्या घरासमोर स्वाभिमान संघटनेचं आंदोलन
मुंबई विद्यापीठातील निकालांच्या गोंधळाला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरांना जबाबदार धरत नितेश राणेंच्या स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले.

मुंबई : मुंबई विद्यापीठातील निकालांच्या गोंधळाला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरांना जबाबदार धरत नितेश राणेंच्या स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले. वायकर यांच्या निवासस्थानासमोर सकाळी आंदोलन करण्यात आलं.
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी वायकरांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी वायकर आणि आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत वायकर यांच्या राजीनाम्याच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे विक्रांत आचरेकर आणि रोहन देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. VIDEO :
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी वायकरांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी वायकर आणि आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत वायकर यांच्या राजीनाम्याच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे विक्रांत आचरेकर आणि रोहन देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. VIDEO : आणखी वाचा