एक्स्प्लोर

‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

मुंबई: ‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले आहेत. आम्ही पोलिसांबद्दल एकही अपशब्द खपवून घेणार नाही, गाठ आमच्याशी आहे. खरंच वाघ असाल तर 'मातोश्री'ची सर्व पोलीस सुरक्षा काढा आणि माझ्यासारखं एकटं फिरून दाखवा, असं शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरेंनी आमच्यासारखं एकट्यानं फिरुन दाखवावं’ ‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले गेले आहेत, जाऊन भांडी घासा.’ पोलिसांबद्दल एक शब्द जरी काढला तर गाठ आमच्याशी आहे. उद्धव ठाकरे जर खरच वाघ असतील तर ‘मातोश्री’चे सर्व पोलीस काढा, मी आणि विद्याताई जसे एकटं फिरतो तसं महाराष्ट्रात फिरून दाखवा. उद्धव एका पोलिसाशिवाय बाहेर जात नाही. त्यांना 40 पोलीस लागतात आणि त्याच पोलिसांना नाव ठेवता? मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला ताकीद देते पोलिसांना काय बोलतात तर याद राखा.’ अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री रोज गुंडांच्या मांडीला मांडी लावून फोटो काढतात’ उद्धव ठाकरेंसोबतच सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान साधलं. ‘रोज गुंडाच्या मांडीला मांडी लावून फोटो काढतात. मुख्यमंत्र्याना लाज वाटली पाहिजे. पुण्यात एक मशीन आणलं आहे मुख्यमंत्र्यांनी, इकडून गुंड घातला कि मुख्यमंत्री गृहखात्याची पावडर टाकतात. मग बाहेर येतो एक सुसंस्कृत माणूस. आमच्या पुण्यात एक शेलार आहे. मुख्यमंत्र्यांनी विचारले, काय करतोस रे बाबा? तो बोलला ‘तडीपार आहे, पाच खून केले आहेत’, मुख्यमंत्री म्हणतात, ‘ये रे बाबा, मशीनमध्ये टाकलं गृहखात्याची पावडर टाकली आणि बाहेर आले माननीय शेलार, मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढला झालं. अशी जोरदार टीका सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.’ ‘ही लोकं एकमेकांचे पाणी काढतात, ही काय संस्कृती आहे?’ ‘सिरीयलवाले कमी भांडतात पण हे शिवसेना-भाजप त्यांच्यापेक्षा जास्त भांडतात. उद्धव ठाकरे म्हणतात, फडणवीसांच्या डोक्यात खड्डे झाले आहेत. तर मुख्यमंत्री म्हणतात. ‘खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे कळत नाही?’ तर दुसरीकडे ही लोकं एकमेकांचे पाणी काढतात. ही काय संस्कृती आहे का?’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेना-भाजपवर टीका केली. संबंधित बातम्या: ‘सामना’ला नख लावला तर महाराष्ट्र पेटून उठेल: उद्धव ठाकरे 'सामना'वर बंदीची मागणी ही लोकशाहीची हत्या : नवाब मलिक हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, तावडेंचा गौप्यस्फोट ...म्हणून मला मुख्यमंत्र्यांची कीव येते: शिवसेना खासदार

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ओमराजे निंबाळकर आपल्या मनाचे राजे, ते खरंच रिअल स्टार, एकनाथ शिंदेंकडून कौतुकाची थाप 
ओमराजे निंबाळकर आपल्या मनाचे राजे, ते खरंच रिअल स्टार, एकनाथ शिंदेंकडून कौतुकाची थाप 
ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं
ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या

व्हिडीओ

Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Eknath Shinde : संजय दिना पाटील बेधडक, ओमराजे मनाचे राजे ते नागेश पाटील आष्टीकर ओपनिंग बॅटसमन, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना शिंदेंकडून खास विशेषणं
बेधडक, मनाचे राजे, ओपनिंग बॅटसमन, एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या फुटीर खासदारांवर कौतुकाचा वर्षाव
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
Rahul Patil : ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीला चार आमदार गैरहजर, परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी अनुपस्थितीबाबत कारण सांगितलं, म्हणाले...
परभणीत मतमोजणी होती त्यामुळं आमदारांच्या बैठकीला गैरहजर, आमदार राहुल पाटील यांनी थेट कारण सांगून टाकलं...
Shivsena : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
Embed widget