एक्स्प्लोर
तरी मोडला नाही कणा... कल्याणच्या ज्ञानराजचा प्रेरणादायी प्रवास
कल्याण : एक अपघात आपला एखादा अवयव निकामी करतो आणि नंतरचं उभं आयुष्यच कारावास बनून राहतं. पण एका तरुणाने आपल्या इच्छाशक्तीपुढे नियतीला गुडघे टेकायला लावले आहेत. ही कहाणी आहे 25 वर्षीय ज्ञानराज होमकरची.
पुण्यात महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनादरम्यान ज्ञानराज रोप वे डान्स सादर करत होता. त्याचवेळी दोरीवरुन ज्ञानराजचा पाय निसटला आणि तो आपल्या हनुवटीवर तब्बल 10 ते 12 फुटांवरुन खाली पडला.
या अपघातात ज्ञानराजच्या मानेतील नसा, मणके निकामी झाले आणि मानेखालच्या संपूर्ण शरीरावरचं नियंत्रण तो गमावून बसला. शरीरारानं संवेदना सोडल्या असल्या तरी ज्ञानराजची इच्छाशक्ती तग धरुन होती.
तोंडात काडी पकडून ज्ञानराजनं हळूहळू कॉम्प्यूटर हाताळायला सुरुवात केली. पाहता-पाहता काडीद्वारे कॉम्प्युटर हाताळण्यात तो तरबेज झाला आणि बारावीनंतर सीईटी सारख्या परीक्षांचा त्यानं अभ्यास केला.
इतकंच नाही, तर त्यातून बारावीनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी स्वतःची वेबसाईट त्यानं विकसित केली आहे. ज्ञानराजचा हा प्रवास हातीपायी धडधाकट असणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement