एक्स्प्लोर
पाकड्यांशी 'मन की नाही तर गन की बात' करा : उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पाकड्यांशी आता 'मन की नाही तर 'गन की बात' करा, अशा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिला. मुंबईत शिवसेनेने आमदार, नगरसेवक आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहेत. याप्रसंगी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानने हल्ला करत दोन भारतीय जवानांची शीरं धडापासून वेगळी करत त्यांची विटंबना केली. यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत होत. पाकिस्तानच्या कुरापती सुरु असतानाही कोणतीही कारवाई न केल्याने सरकारवर टीका केली जात आहे. याबाबत मोदींवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "काश्मीर पेटलेलं आहे. जवानांवर हल्ले होत आहेत. जवानांची मुंडकी उडवली जात आहेत. पंतप्रधानांना मला एक सांगायचं आहे, तुम्ही जो नवा पायंडा पाडलाय 'मन की बात', देशवासियांशी तुम्ही 'मन की बात' करता, पण पाकड्यांशी आता 'मन की नाही तर गन की बात करा'. एकदाच काय तो फडशा पाडून टाका त्यांचा." पाहा व्हिडीओ
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती






















