ATS Mumbai : महाराष्ट्र एटीएसने पश्चिम बंगाल पोलिसांच्या  ( West Bengal Police ) स्पेशल टास्क फोर्स  एसटीएफ (STF)  पथकाला हवा असलेल्या एका संशयित आरोपीला मुंबईतून अटक केली आहे.  सद्दाम खान असे संशयिताचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. जिहादी कार्यकर्त्यांमध्येही त्याचा सहभाग होता. त्याच्या जोडीदाराला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आले आहे. (radicalised covert activities) या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.






एसटीएफ, पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी चंदनगर-देऊलपोटा येथील समीर हुसेन शेख (30) याला डायमंड हार्बर पीएस परिसरातून अटक केली आणि एसटीएफ पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने सद्दाम हुसेन खान ( वय- 34) रा. अब्दुलपूर, पारुलिया कोस्टल पीएस, जिल्हा डायमंड हार्बर याला अटक केली.  निर्मलनगर मुंबई येथून एटीएस मुंबईच्या मदतीने प्रतिबंधित जिहादी दहशतवादी संघटनांशी नियमित संपर्क आणि अत्यंत कट्टरवादी गुप्त कारवायांच्या आरोपाखाली अटक केली.  दोघांनाही पुढील तपासासाठी न्यायालयात पाठवण्यात आले आहे.


गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून संशयीत दहशतवाद्याची अटक होणे ही मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. याआधी मुंबई जवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याच्या हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीत तीन एके 47 रायफल, काडतूसे,   असा शस्त्रसाठा सापडला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन 26/11 सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश होते. त्यामुळे मुंबई पोलिसांसह तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. 


आणखी महत्वाच्या बातम्या :
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश
Aurangabad: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली, यावर्षी गळीत हंगाम लवकर सुरु होणार; सहकार मंत्र्याची माहिती 


Agriculture News : घोणस अळी आली तशी जाईल, भीती बाळगू नका : किटकशास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे