Agriculture News : शेतकऱ्यांमध्ये घोणस नावाच्या अळीची (Ghonas worms) दहशत वाढली आहे. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ही अळी आढळून प्रादुर्भाव झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तीन जणांच्या संपर्कात ही अळी आल्यानं त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे. दरम्यान, ही अळी जशी निर्माण होत आहे तशीच ती निघून ही जाईल. ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे मत लातूरचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय भामरे (Dr. Vijay Bhamre) यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी घोणस अळीला घाबरण्याची गरज नसल्याचे भामरे यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या समोर सातत्यानं नवनवीन संकट येत आहेत. कधी नैसर्गिक संकट तर कधी सरकारी धोरण हे कायम चालूच आहे. अशातच आता घोणस नावाच्या अळीचं नवं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय. या घोणस अळीचा परिणाम केवळ पिकावरच नाही तर माणसांवर देखील होताना पाहायला मिळतोय. बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा गावात ही घोणस अळी चावल्यानं शेतकऱ्यांना रुग्णालयात भर्ती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. अळीच्या संपर्कात आलेल्यांना अॅलर्जी होत. मात्र, याला काही घाबरण्याची गरज नसल्याचे मत लातूरचे किटकशास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे यांनी सांगितले आहे.
कीटकशास्त्र डॉ. विजय भामरे नेमकं काय म्हणालेत
घोणस अळीचा प्रादुर्भाव हा ऊस, गवत, आंबा अशा विविध पिकांवर होताना दिसत आहे. या किड येत आणि निघून जाते. या अळीच्या शरीरावर केस असतात. या केसामधून एक प्रकारचे रसायन बाहेर पडते. ते विषारी असते. अशा प्रकराच्या बऱ्याच अळ्या असतात. पण काही अळ्या या विषारी रसायन बाहेर सोडत असतात. त्यामुळं जक आपण अशा अळीला स्पर्श केला किंवा त्या अळीच्या संपर्कात आपली त्वचा आली तर काही मिनीटातच त्या भागाची आग होते. जवजवळ दोन ते तीन दिवस याचा प्रभाव जाणवू शकतो. काही व्यक्तींमध्ये या रसायनाला अॅलर्जी गुणधर्म असतात, त्यामुळं अशा लोकांना या अळीचा त्रास होता. त्यामुळं ज्या ठिकाणी अशा अळ्या असतील तिला स्पर्श करु नका. अळीला बाहेर उचलून टाकायचे असेल तर ग्लब्ज वापरा आणि टाका अशी माहितीही डॉ. विजय भामरे यांनी दिली. ही अळी कोणत्याही पिकावर मोठ्या प्रमाणात येत नाही. ती येते आणि जाते असेही भामरे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: