एक्स्प्लोर

मुंबई-गोवा महामार्गाबाबत राज्य सरकारचा हलगर्जीपणा, अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करणार

मुंबई- गोवा महामार्गाच्याबाबतीत हायकोर्टानं वारंवार याबबत निर्देश देऊनही सरकारी अधिकारी आपल्या कामात हलगर्जीपणा दाखवत असल्यानं अता या सरकारी अधिकाऱ्यांच्याच विरोधात स्वतंत्र फौजदारी याचिका दाखल करणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी एबीपी माझाला सांगितलं.

मुंबई : मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची प्रगती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करण्याऐवजी पीडब्लूडीच्या वेबसाईटवर कंत्राटदारांच्या वेबसाईटच्या लिंक टाकून राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी गुरूवारी हायकोर्टात केला. गेल्या सुनावणीला मुंबई गोवा महामार्गावर सुरु असलेल्या कामांची माहिती सर्वसामान्यांना कळावी यासाठी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते स्वतंत्र संकेतस्थळावर अपलोड करण्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहेत. त्याचबरोबर चिपळूण ते संगमेश्वर या पट्यातील महामार्गावरील सर्व खड्डे बुजवल्याचा राज्य सरकारचा दावाही याचिकाकर्त्यांनी खोडून काढला आहे. यावर गेल्या सुनावणीला याच पट्ट्यातील रस्त्याची दुरावस्था झाल्याची कबूली देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला पुढील सुनावणीच्यावेळी कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश गुरूवारी हायकोर्टानं जारी केले आहेत. मुळात 2019 ची डेडलाईन असताना चिपळूण ते संगमेश्वर पट्ट्यात अजूनही कंत्राटदारांनी काम सुरूच केलं नसल्यानं ते ही डेडलाईन कशी सांभळणार असा सवालही यावेळी याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला. पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावर (एनएच-66) मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्यांच्या पार्श्वभूमीवर अॅड. ओवैस पेचकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर गुरूवारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर झाली. या महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत कंत्राटदार कंपनीशी केलेल्या करारानुसार त्यांनी चौपदीकरणाच्या कामाचे फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन महामार्गाच्या स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे बंधनकारक असतनाही त्यांनी तसे काहीच केले नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. हायकोर्टानंही यासंदर्भात स्पष्ट निर्देश देऊनही अद्याप राज्य सरकारनं त्याची पूर्तता केलेली नाही. मुंबई- गोवा महामार्गाच्याबाबतीत हायकोर्टानं वारंवार याबबत निर्देश देऊनही सरकारी अधिकारी आपल्या कामात हलगर्जीपणा दाखवत असल्यानं अता या सरकारी अधिकाऱ्यांच्याच विरोधात स्वतंत्र फौजदारी याचिका दाखल करणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी एबीपी माझाला सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget