एक्स्प्लोर

पैशांसाठी मुलानेच बापाची सुपारी देऊन केली हत्या

नवी मुंबईतील नेरुळच्या शिरवणे भागात रहाणारे भाजी व्यावसायिक अरविंद नानाभाऊ गुंड यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. ही हत्या त्यांच्याच मुलाने 3 लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबई : नवी मुंबईतील नेरुळच्या शिरवणे भागात रहाणारे भाजी व्यावसायिक अरविंद नानाभाऊ गुंड यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. ही हत्या त्यांच्याच मुलाने 3 लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी या हत्याप्रकारणात मृत अरविंद गुंड यांचा मुलगा अनिल गुंड याला अटक केली आहे. तसेच अरविंद गुंड यांची हत्या करणाऱ्या संतोष लाडे आणि रोहन बर्गे या दोन मारेकऱ्यांनाही पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे. या घटनेतील मृत अरविंद गुंड यांचा एपीएमसी मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यावसाय असून ते शिरवणेमध्ये कुटुंबासह राहत होते. मागील गुरुवारी अरविद यांची पत्नी कामानिमित्त गावी गेल्या होत्या. त्यामुळे घरामध्ये अरविंद गुंड आणि त्यांचा मुलगा अनिल हे दोघेच होते. त्यामुळे अनिल गुंड याने संतोष लाडे आणि रोहन बर्गे या दोघांना गुरुवारी सकाळी वडिलांची हत्या करण्यासाठी आपल्या घरामध्ये बोलावून घेतले होते. काही वेळाने कामानिमित्त बाहेर जाण्याचा बहाणा करुन तो घरातून निघून गेला. त्यानंतर संतोष लाडे आणि रोहन बर्गे या दोघांनी अरविंद गुंड यांची हत्या करुन तेथून पळ काढला. त्यानंतर दुपारी 12.30 च्या सुमारास अनिलने घरी पोहोचून वडिलांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या झाल्याचा कांगावा केला होता. नेरुळ पोलिसांनी केलेल्या तपासात अरविंद गुंड यांचा मुलगा अनिल गुंड यानेच दोघा मारेकऱ्यांना घरामध्ये घेतल्यानंतर तो घरातून बाहेर गेल्याचे आढळून आले. तसेच ज्या वेळेत अरविंद गुंड यांची हत्या झाली, त्या कालावधित अनिल गुंड हा त्याच भागात वावरत असल्याचे त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी अनिल गुंड याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी सुरु केली. यावेळी अनिलने त्याचे साथीदार संतोष लाडे आणि रोहन बर्गे या दोघांना 3 लाख रुपयांची सुपारी देऊन वडिलांची हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. अनिल गुंड याने डिप्लोमा केल्यानंतरदेखील तो काहीच कामधंदा करत नव्हता. अनिल दारु आणि गांजाच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याचे वडील त्याला पैसेदेखील देत नव्हते. यामुळेच त्याने वडिलांची हत्या घडवून आणली.

महत्त्वाच्या बातम्या

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget