एक्स्प्लोर

सण-उत्सवांसह सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना राज्यभरात समान नियमावली हवी : हायकोर्ट

गणेशोत्सव आणि नवरात्रीसारख्या सार्वजनिक सण-उत्सवादरम्यान बांधण्यात येणाऱ्या मंडपांबाबत राज्यभरातील महापालिकांमध्ये वेगवेगळ्या नियमावली आहेत. त्यामुळे राज्यभरात मंडपांसाठी एकसमान नियमावली असावी, अशी मागणी गुरुवारी याचिकाकर्ते आवाज फाऊंडेशनच्यावतीने हायकोर्टात करण्यात आली.

मुंबई : सण, उत्सवांसह सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मंडप उभारण्याची परवानगी देताना राज्यभरातील सर्व महापालिका क्षेत्रात एकच नियमावली असावी, यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करण्याबाबत विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्रीसारख्या सार्वजनिक सण-उत्सवादरम्यान बांधण्यात येणाऱ्या मंडपांबाबत राज्यभरातील महापालिकांमध्ये वेगवेगळ्या नियमावली आहेत. त्यामुळे राज्यभरात मंडपांसाठी एकसमान नियमावली असावी, अशी मागणी गुरुवारी याचिकाकर्ते आवाज फाऊंडेशनच्यावतीने हायकोर्टात करण्यात आली. सण-उत्सवातील ध्वनी प्रदूषण आणि बेकायदेशीर मंडप यांसदर्भातदाखल विविध याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. वाहनांच्या गोंगाटासह अन्य प्रकारच्या ध्वनीप्रदूषणाबाबत राज्य सरकारने ठोस मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करावी, अशी मागणीही याचिकार्त्यांवतीने करण्यात आली. याबाबत अनेक सूचनाही याचिकाकर्त्यांनी वारंवार दाखल केल्या आहेत. यामध्येच मंडप उभारण्याची परवानगी देताना एकाच प्रकारची नियमावली असण्याबाबतची शिफारस याचिकाकर्त्यांनी केली आहे. या सर्व शिफारशींबाबत राज्य सरकारने विचार करावा, असे खंडपीठाने म्हटले आहे. ठाणे, भिंवडी, मीरा भाईंदर, मालेगाव आणि उल्हासनगर या महापालिकांनी ध्वनी प्रदूषणावरील कारवाईबाबत अद्यापही प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली. ध्वनी प्रदूषणाबाबत संपूर्ण राज्याची आकडेवारी सादर करण्याबाबत नीरीनं याआधीच बारा महिन्यांचा अवधी मागितला आहे. तर मुंबई पोलिसांनीही गेल्या वर्षभरातील ध्वनी प्रदूषणीच्या सर्व केसेसवर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी कोर्टाकडे मागितला. मात्र एवढा कालावधी कशासाठी हवा? असा सवाल करत, हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने अंतिम संधी दिली असून पुढील सुनावणी दोन मे रोजी होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget