एक्स्प्लोर

सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरण: जयश्री पाटील यांना मोठा दिलासा, 29 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण

Silver Oak St Protest: गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे.

Silver Oak St Protest: गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. सिल्व्हर ओकवरील आंदोलनप्रकरणी येत्या 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना जारी करण्यात आले आहेत. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून यात तपास सुरू आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देऊ नये, अशी भूमिका घेत राज्य सरकारच्यावतीनं जयश्री पाटील यांच्या याचिकेला राज्य सरकारनं जोरदार विरोध केला होता. मात्र एफआयआरमध्ये त्यांचं अद्याप नाव टाकलेलं नाही. तिसऱ्या रीमांडला पाटील यांच्या सहभागाचा उल्लेख झाला तसेच एफआयआर क्रमांकांमध्ये काही तांत्रिक दोष असल्याच्या मुद्यावर कोर्टानं त्यांना अंतरिम दिलासा मंजूर केला. 

115 आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचा जामीनासाठी अर्ज

दरम्यान याच प्रकरणी अटक होऊन सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या 115 एसटी कर्मचाऱ्यांनीही जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. यात 24 महिलांचा समावेश असून या सर्व आंदोलकांना, आर्थर रोड, तळोजा, भायखळा अश्या विविध कारागृहात जागेच्या उपलब्धतेनुसार ठेवण्यात आलं आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी, 20 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. यापैकी बरेसचे जण हे मुंबईबाहेरून आले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांकडे जामीनाची अनामत रक्कम भरण्यासाठीही पैसे नाहीत. हमीदार नाही अशी त्यांची बिकट अवस्था असल्याचं त्यांच्या जामीन अर्जात नमूद केलेलं आहे.

जयश्री पाटील यांना या मुद्यांवर मिळाला अटकेपासून दिलासा 

डॉ. जयश्री पाटील यांच्या या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायाधीश आर.एन. सादारणी यांच्यापुढे सोमवारी सुनावणी झाली. अद्याप गावदेवी पोलीस ठाण्यात जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेची प्रतर दिलेली नाही. तसेच हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून तपास सुरू असल्यानं आरोपीला कोणताही दिलासा देऊ नये, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली. मात्र पोलीसांनी याचिकेची प्रत स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप जयश्री पाटील यांच्या वकिलांनी कोर्टात केला. निरंजन मुंदरगी करत आहेत जयश्री पाटील यांच्यासाठी युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टात स्पष्ट केलं की, या प्रकरणात दाखल एफआयआरमध्ये जयश्री पाटील यांच्या नावाचा समावेश नाही. याप्रकरणी अटकेत असलेले त्यांचे पती आणि एसटी कामगारांचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांच्या तिस-या रिमांडच्यावेळी पोलीसांनी पाटील यांचाही याप्रकरणी सहआरोपी म्हणनू समावेश केला. या कटात त्याही सहभागी असल्याचा पोलीसांचा आरोप आहे. तसेच एसटी आंदोलनातून 'आर्थिक लाभ' उठवल्याचा जयश्री पाटील यांच्यावर आरोप आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडनं प्रत्येकी 530 रूपये जमा केले, मात्र कोणतीही पावती दिली नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र सिल्व्हर ओकवरील आंदोलनाशी याचा संबंध जोडू नये, यासाठी स्वतंत्र गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे. तसेच मुंबई पोलीसांनी दाखल केलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये क्रमांकांचा तांत्रिक घोळ आहे. या गोष्टी विचारात घेत कोर्टानं 29 एप्रिलपर्यंत जयश्री पाटील यांना अंतरिम दिलासा दिला आहे.

काय आहे प्रकरण

राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी दुपारच्यावेळी अचानकपणे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या दिशेनं चपला भरकावल्या तर महिला आंदोलकांनी बांगड्या फोडत पवार कुटुंबियांविरोधात जोरदार नारेबाजी केली होती. साधराण तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलीसांनाी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं होतं. याप्रकरणी गावदेवी पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget