Shrikant Shinde : कल्याण ते वांगणी दरम्यानच्या मार्गिकेसाठी आवश्यक असलेलं भूसंपादन करावं, खासदार श्रीकांत शिंदे यांचे निर्देश
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवील मतदारसंघातील कामांसाठी रेल्वेच्या डीआरएमला भेट दिली.
कल्याण : कल्याण ते वांगणी दरम्यानच्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादन करण्यात यावं, असे निर्देश शिंदे गटाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिले आहेत. तसेच 3 आणि 4 लाईनबाबत चर्चा झाली असून जेवढी जमीन आवश्यक आहे, तेवढीच घ्यावी असं देखील श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या डीआरएमला म्हटलं. मतदारसंघातील रेल्वेच्या कामांचा आढावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवार 27 जानेवारी रोजी घेतला.
यावेळी श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या डीआरएमसोबत चर्चा देखील केली. मतदारसंघातील रेल्वेशी संबंधित कामांसदर्भात ही चर्चा झाल्याचं यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. तसेच शौचालय, अतिरिक्त गाडया कल्याण डोंबिवली यांसदर्भातले काही विषय होते, त्याबाबत देखील सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिली. सर्वात जास्त कामं ही आतापर्यंत कल्याणमध्ये झाली आहेत, तसेच अनेक कामांसंदर्भात आढावा देखील घेतला जातोय, असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक
मराठा आंदोलनाला आज यश मिळालं. सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक होतं. या समाजाला कसा न्याय देता येईल यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काम करत होते. मराठा आंदोलनाचा शेवट गोड झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रामाणिकपणे कायद्याच्या चौकटीत जे टिकेल ते जाहीर केलं. 57 लाख कुणबी दाखले शोधले, नोंदणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली, कोणाच्या ताटातून कोणाला देत नाही, ज्या नोंदी शोधल्या गेल्या नाहीत, त्या शोधण्याचं काम सुरु आहे. जे मराठा समाजाच्या हक्काचं आहे, ते देण्याचं काम सरकारने केलं आहे. यामध्ये कुणीही गैरसमज पसरवत असेल तर ते चुकीचं आहे, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा अध्यादेश सुपूर्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा अध्यादेश शनिवार 27 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्यात आला आहे. यामुळे मराठा समाजामध्ये एकच आंनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी मनोज जरांगे यांनी व्यासपीठावर देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मनोज जरांगे यांनी देखील यावेळी मराठा समाजाला अनेक सवलती दिल्याचं स्पष्ट केलं असल्याचं म्हटलं.