एक्स्प्लोर
Advertisement
आरोपीने भिवंडी न्यायालयात न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली
भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केलेला हा आरोपी मागील 14 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता.
भिवंडी : शिक्षेची सुनावणी करतानाच आरोपीने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी न्यायालयात घडला. अशरफ अन्सारी असं 22 वर्षीय आरोपींचं नाव असून तो भिवंडीतील आमपाडा इथे राहतो.
आरोपी अशरफ अन्सारीवर वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 454, 380, 457, 34 अंतर्गत भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच गुन्ह्यांच्या संदर्भात काल भिवंडी न्यायालयात न्यायाधीश पठाण यांच्यासमोर शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.
भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केलेला हा आरोपी मागील 14 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याला काल (29 जानेवारी) दुपारच्या सुमारास भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस.जे.पठाण यांच्यासमोर हजर केलं होतं. तुला गुन्हा कबूल असेल तर दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असं न्यायाधीशांनी यावेळी अशरफला सांगितलं. मात्र मी आधीच 14 महिने शिक्षा भोगली असून ती कापून मला सोडून द्यावं, अशी विनंती आरोपीने केली.
परंतु असं होऊ शकत नाही, आणखी सहा महिने शिक्षा भोगावीच लागेल, असं न्यायाधीशांनी सांगताच आरोपीला राग अनावर झाला. या रागातूनच त्याने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता.
या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement