एक्स्प्लोर
शिवसेनेचं मिशन 2019 सुरु, संपर्कप्रमुख बदलण्यास सुरुवात
शिवसेनेनं 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

मुंबई : शिवसेनेनं 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. यासाठी शिवसेनेनं पक्षांतर्गंत बदल करण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात संपर्कप्रमुखांच्या बदल्यांपासून केली आहे. रायगड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असलेल्या आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाची जबाबदारी असल्यानं रायगडच्या संपर्कप्रमुख पदी ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अनंत तरे यांच्याकडे महाड, श्रीवर्धन, अलिबाग आणि पेणची जबाबदारी असणार आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्याकडे कर्जत-खालापूर, पनवेल आणि उरणची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार रवींद्र फाटक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोकण विभागातील महत्वाचे बदल करुन शिवसेनेनं तेथील आपला पाया आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय






















