एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना मोठे फेरबदल करणार

आशिष चेंबुरकर आणि मंगेश सातमकरांना स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे देण्यास सांगिण्यात आलं. यानंतर स्थायी समिती अध्यक्षपद, शिक्षण समिती आणि इतर वैधानिक समित्यांमध्येही बदल पाहण्यास मिळणार आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना मोठे फेरबदल करणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या महत्त्वाच्या समित्यांमधील सदस्य आणि अध्यक्षपदांमध्ये महत्वाचे फेरबदल होणार असल्याचे संकेत आहेत. या फेरबदलांची सुरुवात आजपासूनच झाली आहे. आशिष चेंबुरकर आणि मंगेश सातमकरांना स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे देण्यास सांगिण्यात आलं. यानंतर स्थायी समिती अध्यक्षपद, शिक्षण समिती आणि इतर वैधानिक समित्यांमध्येही बदल पाहण्यास मिळणार आहेत. कोणते फेरबदल होणार? 1) मंगेश सातमकर आणि आशिष चेंबुरकर या दोन अनुभवी नगरसेवकांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोण? शक्यता 1 - मनसेतून शिवसेनेत गेलेले दिलीप लांडे हे आधीही स्थायी समितीच्या सदस्यपदी होते. त्यांचे पद कायम केले जाऊ शकते. तसंच मनसेतील आणखी एकाला दुसरे सदस्यत्व दिले जाऊ शकते. शक्यता 2 - शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. 2) मंगेश सातमकर आणि आशिष चेंबुरकर कुठे जाणार? शक्यता -  या अनुभवी नगरसेवकांच्या अनुभवांचा उपयोग करुन घेण्यासाठी सातमकरांना शिक्षण समिती अध्यक्षपद तर चेंबुरकरांना बेस्ट समिती अध्यक्षपद दिले जाईल. असं झाल्यास मराठी शाळांच्या मुद्द्यावर सातमकरांच्या अनुभवाचा उपयोग शिक्षण समितीत करुन घेता येईल. तसंच, सातमकरांना शिक्षण समिती अध्यक्ष हा स्थायी समितीतील पदसिद्ध सदस्य या नियमानं पुन्हा मागच्या दारानं स्थायी समितीत परतण्याची संधी मिळेल. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला सावरण्यासाठी तीन वर्षांचा बेस्ट समिती अध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या चेंबुरकरांचाही बेस्टला फायदा होईल. 3) मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना संधी मिळेल का? शक्यता 1- सध्या रमेश कोरगांवकर यांचा स्थायी समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ 31 मार्च पर्यंत आहे. त्यांच्या जागी मनसेतून आयात केलेल्यांना खुष करण्यासाठी दिलीप लांडे यांनाही स्थायी समिती अध्यक्ष पदावर बसवले जाऊ शकते. शक्यता 2 - इतर वैधानिक समित्यांमध्ये आणि विशेष समित्यांमध्ये सदस्यत्वपद देऊन बोळवण केली जाऊ शकते शक्यता 3 - मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी 4 जणांना पुढच्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे तिकीट देण्याचं आश्वासन आहे. त्यामुळे महापालिकेत काहीही न देता पुढच्या विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले दाऊ शकते. स्थायी समितीसह सर्व वैधानिक आणि विशेष समित्यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो. एक वर्षानंतर नवे सदस्य नवा अध्यक्ष निवडून देतात. मात्र सत्ताधारी संख्याबळ अधिक असलेल्या पक्षानं ठरवलं तर आधीचाच अध्यक्षाला पुन्हा वाढीव काळ दिला जातो. यंदा 31 मार्चपर्यंत सर्व समित्यांच्या कार्यकाळाची मुदत आहे. त्यामुळे एप्रिलमधल्या पहिल्या बैठकीत नवे सदस्य आणि नवा अध्यक्ष पाहायला मिळेल. यासाठी निवृत्त आणि कायम करण्यात येणारे सदस्य यापूर्वीच चिठ्ठ्या टाकून निश्चित करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget