एक्स्प्लोर

सरकार नराधमांना पाठिशी घालतंय; काळ्या फिती अन् पावसात उद्धव ठाकरे, शिवसेना भवनाबाहेर आंदोलन

आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल.आपापल्या गावागावात, शहरात ‘बहीण सुरक्षित, घर सुरक्षित’ अशी स्वाक्षरी मोहीम घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.

मुंबई :कोर्टाने बंद करण्यास बंदी घातली, मात्र अत्याचाराविरोधात घराघरात मशाल धगधगत आहे. सरकारमध्ये हिंमत नाही. ते गुन्हेगारांना ते पाठीशी  घालत आहेत. नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. निर्ढावलेलं सरकार आपल्यावर राज्य करतंय, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena)  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  सरकारवर कठोर टीका केली आहे.  मुंबईत (Mumbai News)  शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरेंनी काळ्या फिती बांधून  बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात रश्मी ठाकरे,  आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले,  कोर्टाने ठरवलं तर निर्णय घेऊ शकतं. बंदला बंदी केली असली तरी राज्यातील प्रत्येक हृदयात तुमच्या विरोधात मशाल धगधगत आहे. महिलांना सुरक्षा पाहिजे म्हणून बंद केला. त्यात अडथळा आणला. गेल्या आठवड्यात भारत बंद झाला. इतर राज्यात रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते. तेव्हा बंदला विरोध केला नाही.

आजपासून स्वाक्षरी मोहीम राबवा : उद्धव ठाकरे

आजचं आंदोलन विकृती विरुद्ध संस्कृतीचं आहे.सरकार निर्लज्जपणे वागतंय, या सरकारला घालवावंच लागेल. आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल.आपापल्या गावागावात, शहरात ‘बहीण सुरक्षित, घर सुरक्षित’ अशी स्वाक्षरी मोहीम घ्या. आजपासून गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी स्वाक्षरी मोहिम  राबवा.. या स्वाक्षऱ्या उच्च न्यायालयाला पाठवू हा बंद का करत होतो ते सांगू. सरकार आरोपीना पाठिशी घालणार असेल तर आम्ही आवाज उचलणारचं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

एका बाजूला बहिणीवर अत्याचार होतोय तर कंसमामा राख्या बांधत फिरतायत : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले,  सरकारकडून सर्व दार बंद झाली की रस्त्यावर उतरावं लागतं. संकटाचा सामना करण्याची हिंमत नाही. हे निर्ढावलेलं सरकार आहे. चेले चपाटे कोर्टात पाठवून बंदला विरोध केला. आम्ही कोर्टात गेलो न्याय कधी मिळेल ही आशा आहे.  काल कोर्टात गेल्यावर तात्काळ निर्णय दिला. एका बाजूला बहिणीवर अत्याचार होतोय आणि एका बाजूला कंसमामा राख्या बांधत फिरतायंत. 

Uddhav Thackeray Mumbai Protest : शिवसेना ठाकरे गटाचं शिवसेनाभवनाबाहेर आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

हे ही वाचा :

Supriya Sule: आरोपीला फाशी होईपर्यंत मविआ कार्यकर्ता शांत राहणार नाही, भर पावसात पुण्यात सुप्रिया सुळेंचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atal Setu Bridge Story : मुंबईकरांचं आयुष्य बदलणारा एक पूल! अटल सेतूच्या निर्मितीची संपूर्ण कहाणीUddhav Thackeray Speech : मुंब्रात शिवरायांचं मंदिर, भर सभेत उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उत्तरJob Majha : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी : 6 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaUddhav Thackeray bodyguard :सभास्थळी जाण्यापासून सुरक्षारक्षकांना पोलिसांनी रोखलं, उद्धव ठाकरे भडकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
Embed widget