एक्स्प्लोर

‘मुंबई बुडाली होSS’ म्हणणाऱ्यांची नागपुरात नाचक्की – सामना

“एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?” असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय. तर कंठशोष करणाऱ्या वाचाळवीरांना कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी अशी कोपरखळीही लगावली.

मुंबई : नागपूरमध्ये कालपासून सुरु पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडले. “एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?” असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय. तर कंठशोष करणाऱ्या वाचाळवीरांना कंठसुधारक वटी नेऊन द्यायला हवी अशी कोपरखळीही लगावली. “मुंबई महापालिका आणि शिवसेनेविरुद्ध कोणी कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याची इतकी नाचक्की का ओढवली, यावर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही” अशा तिरकस शब्दांत सामनाने कालच्या नागपुरातल्या स्थितीवर भाष्य करत भाजपला टोला लगावला आहे. “नागपुरातील मुसळधार पावसामुळे विधान भवनातच पाणी शिरल्याने विधिमंडळाचे अधिवेशन दिवसभरासाठी स्थगित करण्याची भयंकर नामुष्की सरकारवर ओढवली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेले नागपूर काही तासांच्या पावसाने जलमय झाले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरते आहे, रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये होत आहे, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार” अशा सामनातून शिवसेनेने थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तर ‘विकास पुरुष’ म्हणून ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवरही टीका केली. “आपल्या लाडक्या शहराची आज जी अवस्था झाली ती बघून धडाकेबाज गडकरींनाही निःसंशय वेदना झाल्या असणारच” असे सामनात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
Mumbai Rajbhavan : खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget