एक्स्प्लोर

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं मुंबई महापालिका आयुक्तांना आणखी एक पत्र, कोणते प्रश्न केले उपस्थित?

Aaditya Thackeray : 650 कोटी वाचावे यासाठी मुंबई महापालिका आयुक्त यांना पत्र लिहून आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Aaditya Thackeray : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना आणखी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आयुक्तांना विनंती केली आहेत. यामध्ये मुंबईतील रस्त्यांच्या कामांसदर्भात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. रस्त्यांची कामे सुरू होत नाहीत, तोपर्यंत 10 टक्के अॅडव्हान्स रक्कम कंत्राटदारांना देऊ नका, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

6080 कोटी रूपयांची सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू होणे शक्य नाहीत. त्यामुळे संबंधित कंपन्यांना अगोदरच 10 टक्के अॅडव्हान्स रक्कम न देण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. असं झाल्यास बीएमसीला व्याजापोटी मिळणाऱ्या 30 कोटी रूपयांवर पाणी सोडावे लागणार, असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 

650 कोटी रूपये रक्कम अॅडव्हान्स म्हणून दिल्यास महिन्याला त्यावर मिळणारे व्याज साडेतीन कोटी रूपये इतके असून 8 महिन्यांचे व्याज 30 कोटी रूपये होते. रस्त्यांची कंत्राटे कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी दिलेली नाहीत, तसंच त्यांच्या राजकीय नेत्यांना फायदा होऊ द्यायचा नसेल तर अॅडव्हान्स रक्कम देणे थांबवा, असे आदित्य ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलेय. रस्त्याचे काम 2023 च्या अखेरीस सुरू होत असताना "अ‍ॅडव्हान्स मोबिलायझेशन" म्हणून कंत्राटदारांना जवळपास 650 कोटी का दिले जाताय ? हा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

हे 650 कोटी वाचावे यासाठी मुंबई महापालिका आयुक्त यांना पत्र लिहून आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी आणि मुंबईकरांना लुटण्यासाठी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी  ट्विट करून केला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलेय? -

BMC चे रोड-स्केल, घोटाळा आणि रस्त्यांच्या मेगा टेंडरमध्ये सेटिंग उघड करून मुंबईचे जवळपास ₹450 कोटी वाचवल्यानंतर, मेगा रोड घोटाळ्यातून आणखी ₹650 कोटी वाचवण्यासाठी मी BMC आयुक्त यांना दुसरे पत्र लिहिले आहे.

  1.  5 कंत्राटदारांनी 5 पॅकेटसाठी बोली लावली. 40% वरील सुधारित SOR + 18% GST वेगळे (पहिल्यांदा) अंदाजे 8% वर प्रत्येकी 1 पॅकेट जिंकले. आम्ही हे उघड केल्यानंतर, बीएमसीने निविदा प्रक्रियेचा आदर न करता, अक्षरशः पसंतीची निवड न करता 40%+ च्या बरोबरीने कंत्राटे दिली.
  2. एकतर्फी वर्क ऑर्डर दिल्यानंतर, आम्ही ऐकतो की, पाचपैकी दोव कंत्राटदारांनी अद्याप सुधारित दर स्वीकारलेले नाहीत आणि त्यांना वाटाघाटी करायच्या आहेत.म्हणजे तांत्रिकदृष्ट्या अद्याप वर्कऑर्डर न दिल्याने जनतेची फसवणूक होत आहे.
  3. शिवाय, 2 कंत्राटदारांनी वर्क ऑर्डर स्वीकारल्या नाहीत आणि 2023 च्या अखेरीस काम सुरूही होणार नाही, तरी बीएमसी ने "अ‍ॅडव्हान्स मोबिलायझेशन" म्हणून कंत्राटदारांना जवळपास ₹650 कोटी देण्यास उत्सुक आहे. कोणत्या आनंदासाठी?
  4. बीएमसीने अद्याप प्रस्तावित अव्यवहार्य रस्त्यांच्या कामांसाठी "कोणतीही वाढ नाही" कलम आहे की नाही ? याचे उत्तर देणे बाकी आहे ज्यामुळे केवळ मुंबईचे पैसे लुटतील आणि कंत्राटदारांना फायदा होईल.

अवैध राज्य सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांचे आहे हे आम्हाला माहीत आहे, पण ही त्यांच्याकडून आमच्या शहराची उघड लूट आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Embed widget