Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates : आज महाराष्ट्रातून शिवसैनिक आले आहेत, ही भगवी लाट आहे: एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde Dasara Melava 2023 Live : आझाद मैदानावर शिवसैनिकाची गर्दी वाढू लागली आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 24 Oct 2023 08:48 PM
Shiv Sena Dasara Melava 2023 Eknath Shinde: हिंमत केली, सरकार आडवं कलं आणि इकडे आलो: एकनाथ शिंदे

Shiv Sena Dasara Melava 2023 Eknath Shinde: तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठ्या खाल्ल्या ते सांगा. तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती. बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यांनी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी काही बदल झाला का? काल मी कार्यकर्ता, आज आणि उद्या कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. हिंमत करून, सरकार आडवं करून मी तिकडून इकडे बसलोय. तुमच्यातील एक जण उद्या मुख्यमंत्री झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तमाम जनता माझ्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत मला पदाची कसलीही लालसा नाही. मी दावोसमध्ये जातो आणि मुंबईच्या नाल्यामध्ये उतरतो, गरीबांच्या वसतीमधील शौचालयाची पाहणी देखील करतोय.

Shiv Sena Dasara Melava 2023 Eknath Shinde: सितेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले: एकनाथ शिंदे

Shiv Sena Dasara Melava 2023 Eknath Shinde: पवारांकडे दोन माणसं पाठवले आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा असं त्यांना सांगितलं. 2004 सालापासून त्यांना ही इच्छा होती, पण जुगाड काही लागत नव्हता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच टूनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, पोटातलं पाणी पण हलू दिलं नाही. शेवटपर्यंत त्यांनी समजू दिलं नाही. सितेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले.

Shiv Sena Dasara Melava 2023 Eknath Shinde: तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे: एकनाथ शिंदे

Shiv Sena Dasara Melava 2023 Eknath Shinde: निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिले. त्यानंतर निर्लजाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच 50 कोटींची मागणी करता. तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे. त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले.

Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates: एकनाथ शिंदेंनी केलं अब्दुल सत्तार यांचे कौतुक

Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates:  इतर समाजाचा आपण सन्मान करतोय त्यांचाही आदर करतोय त्याचा सन्मान करत आपण पुढे जातोय अब्दुल सत्तार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसला आहे शिवसैनिक म्हणून साबीर शेख बाळासाहेब यांच्या काळात मंत्री होते हे आमचे हिंदुत्व आहे ही आमची शिवसेना आहे सत्तेसाठी कधीही खुर्चीसाठी आम्ही तडजोड केली नाही करणार नाही आणि म्हणून आज अब्दुल सत्तार पण आमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे स्वतः एसटीच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांसोबत आले आणि ते कार्यकर्त्यांबरोबर बसले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो.

आज महाराष्ट्रातून शिवसैनिक आले आहेत, ही भगवी लाट आहे: एकनाथ शिंदे

मुंबई: आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेली अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.  आज महाराष्ट्रातून शिवसैनिक आले आहेत, ही भगवी लाट आहे. आज आझाद मैदानावर हा आझाद असा मेळावा होतोय असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates: एकनाथ शिंदे

Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates: आझाद मैदानाला देखील इतिहास आहे. अशा आझाद मैदानावर हा शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. पहाटेपासून लोक आले आहेत: एकनाथ शिंदे

Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात

Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात

Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates : मराठा आरक्षणासाठी लढण्याची माझी देखील तयारी आहे, पण ते टिकलं पाहिजे: रामदास कदम

मराठा आरक्षणासाठी लढण्याची माझी देखील तयारी आहे, पण ते टिकलं पाहिजे: रामदास कदम

Gulabrao Patil Dasara Melava : आम्ही 50 लोकांनी देशात इतिहास लिहिलाय : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Dasara Melava :  आम्ही 50 लोकांनी देशात इतिहास लिहिलाय : गुलाबराव पाटील

Shiv Sena Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्याच्या स्टेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एन्ट्री

Shiv Sena Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्याच्या स्टेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एन्ट्री




Gulabrao Patil Dasara Melava : आम्हाला गद्दार म्हणता, मग आमच्यासोबत लव्ह मॅरेज करणाऱ्या अजित पवारांना काय म्हणणार? गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाला सवाल

Gulabrao Patil Dasara Melava : आम्हाला गद्दार म्हणता, मग आमच्यासोबत लव्ह मॅरेज करणाऱ्या अजित पवारांना काय म्हणणार? गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाला सवाल

Shiv Sena Dasara Melava 2023 :  गुलाबराव पाटील यांच्या भाषणाला सुरुवात

गेली 37-38 वर्षापासून गावामध्ये दसरा कसा होतोय? आम्ही पाहिला नाही. सुलभ शौचालयमध्ये अंघोळ करायची, मराठी माणसाकडे वडापाव खायचा आणि संध्याकाळी चार वाजता नवे कपडे घालून शिवतीर्थावर जागा पकडायची, असे आम्ही कार्यकर्ते आणि आज आम्हाला बरेच लोक गद्दार म्हणत आहेत: गुलाबराव पाटील

ठाकरे आडनाव नाही वाकडे आडनाव लावा: ज्योती वाघमारे

बाळासाहेबांना थेरडा म्हणणारी बाई, तुळजाभवानीची चेष्टा करणारी बाई जर यांचा चेहरा असेल तर थू...अशा बाईच्या पदराआड राजकारण करत असाल तर थू...
हिंदुत्व विरोध करणाऱ्या लोकांना सन्मानाचं स्थान देताय. ठाकरे आडनाव नाही वाकडे आडनाव लावा. लोकांच्या पुढे वाकण्यात जिंदगी गेली. संजय राऊतांना वेड्यांच्या इस्पितळात जाऊन शॉक दिला पाहिजे.  पेंग्विन आणणारा मर्द नाही तर अफजलखानाची वाघनखं आणणारा मर्द असतो, असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.



मतांसाठी पावसात भिजणारे भरपूर. पण लोकांच्या मदतीसाठी धावणारा मर्द : ज्योती वाघमारे

बाळासाहेबांच्या विचारांसाठी छाताडावर केसेस घेणारा मर्द असतो. मतांसाठी पावसात भिजणारे भरपूर. पण लोकांच्या मदतीसाठी धावणारा मर्द. अफजल खानाची समाधी उद्ध्वस्त करणारा मर्द. महिलांना सन्मान देणारी बाळासाहेब ठाकरेंची महिला आघाडी उभी केली, महिलांना सन्मान दिला

अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणारा मर्द नसतो, रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा मर्द असतो : ज्योती वाघमारे

तिकडे जमले आहेत सत्तेसाठी इमान विकलेले कावळे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, आज 57 वर्षांची परंपरा असणाऱ्या या मेळाव्याच्या मंचावरून प्रश्न,मर्द कुणाला म्हणायचं? कोरोना काळात घरात बसणारा की पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेणारा,अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणारा मर्द नसतो, रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा मर्द असतो.



Shiv Sena Dasara Melava 2023 : ज्योती वाघमारे यांच्या भाषणाला सुरुवात

Shiv Sena Dasara Melava 2023 : माझ्या रक्ताच्या थेंबा-थेंबात बाबासाहेबांचा विचार आहे.मा झ्या काळजाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे: ज्योती वाघमारे

Shiv Sena Dasara Melava 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रॉस मैदानात रावण दहनाचा कार्यक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रॉस मैदानात रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला आहे. त्यानंतर ते दसरा मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रमासाठी आझाद मैदानाकडे रवाना होत आहेत. 

Shiv Sena Dasara Melava 2023 :  आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात अवधूत गुप्तेनं गायलं 'राजं आलं राजं आलं' गाणं

Shiv Sena Dasara Melava 2023 :  आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात अवधूत गुप्तेनं   'राजं आलं राजं आलं' हे गाणं गायलं.



Shiv Sena Dasara Melava 2023 : आझाद मैदानातील मेळाव्यात नंदेश उमप यांनी सादर केला पोवाडा

Shiv Sena Dasara Melava 2023 : आझाद मैदानातील मेळाव्यात नंदेश उमप यांनी  पोवाडा सादर केला आहे. 



Shiv Sena Dasara Melava 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

Shiv Sena Dasara Melava 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

Shiv Sena Dasara Melava 2023 : शिवसेनेचा दसरा मेळावा लाईव्ह
Shiv Sena Dasara Melava 2023: आझाद मैदानातील लाईव्ह भाषणाची लिंक

आझाद मैदानातील लाईव्ह भाषणाची लिंक, 


Shiv Sena Dasara Melava 2023: एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक कल्याणवरून लोकलने रवाना
Shiv Sena Dasara Melava 2023: शिवसेनेचे कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी कल्याणवरून लोकलने आले आहेत. आझाद मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक लोकलने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने लोकलने रवाना झाले आहेत. 
Shiv Sena Dasara Melava 2023 : आझाद मैदानावर मुस्लिम महिला आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित

आझाद मैदानावरील शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मुस्लिम महिलांची मोठी उपस्थिती असल्याचं दिसून येतंय. तसेच या मेळाव्यासाठी शेतकरीसुद्धा उपस्थित आहेत. नवी मुंबईतून शिवसेना ( शिंदे गट ) कार्यकर्ते मुंबईत जाण्यास सुरवात झाली असून हजारोच्या संख्येने बसमधून शिवसैनिक आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत. 

Shiv Sena Dasara Melava 2023: आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी पालघर मधून हजारो शिवसैनिक रवाना
Shiv Sena Dasara Melava 2023: आझाद मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळावासाठी पालघर मधील मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत . पालघर मधून साधारणता 700 ते 800 खाजगी वाहनाने हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले असून त्याआधी हे सर्व कार्यकर्ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथे एकत्र झाले . मनोर येथे आलेल्या कार्यकर्त्यांच तारपा या आदिवासी पारंपारिक वाद्याने स्वागत करण्यात आल . येण्या-जाण्यासाठी कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली असून कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली . खासदार राजेंद्र गावित , जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले.

 
Dada Bhuse on Dasara Melava : टीका करणार नाही, आज मुख्यमंत्री सरकारच्या कामांबद्दल बोलतील: दादा भुसे

Dada Bhuse on Dasara Melava : दादा भुसे हे 'एबीपी माझा' सोबत बोलताना म्हणाले की, "मुख्यमंत्री आज  सरकारच्या कामांबद्दल बोलतील. ते टीका करणार नाही"





Shiv Sena Dasara Melava 2023 : शिंदे गटाचे चार नेते भाषण करण्यासाठी सज्ज

Shiv Sena Dasara Melava 2023 : एकनाथ शिंदे यांच्याशिवाय चार प्रमुख नेते भाषण करणार आहेत. या चार नेत्यांची यादी शिंदे गटाने जाहीर केली आहे


शिंदे गटाचे हे नेते करणार भाषण-


रामदास कदम
गुलाबराव पाटील
शहाजी बापू पाटील
ज्योती वाघमारे

Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates : अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमधून 140 एसटी बस मुंबईत दाखल 

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सोयगाव मतदार संघातून 140 एसटी बस मुंबईत दाखल झाल्या आहेत. मागच्या वेळी बीकेसी इथे पार पडलेल्या मेळाव्या वेळी नागरिकांना खोटं बोलून मुंबईत आणल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर झाला होता. त्यामुळे यंदा अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातून दोनशे बस गाड्या येणे अपेक्षित असताना केवळ 140 बस मुंबईत दाखल झाले आहेत. तब्बल 60 एसटी बसेस रद्द करण्याची वेळ अब्दुल सत्तार यांच्यावर आली आहे. सध्या या सर्व गाड्या मंत्रालय ते आझाद मैदान रस्त्यावर लावण्यात आले असून हळूहळू सोयगाव सिल्लोड मतदारसंघातील नागरिक आणि शिवसैनिक आझाद मैदानाच्या दिशेने जायला सुरुवात झाली आहे. 

पार्श्वभूमी

CM Eknath Shinde Dasara Melava 2023 Live : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या (Shivsena Dasara Melava) दोन्ही गटाची जय्यत तयारी झाली आहे. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार तर आझाद मैदानावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) तोफ धडाडणार आहे. आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांना आत सोडलं जात असून पोलिसांकडून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


दुसरीकडे आझाद मैदानावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा असणार आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने आता कार्यकर्ते आपापल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी रवाना झालेत.  मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झालीय.  आझाद मैदानावर तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. 


शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली जाणार आहे. याच खुर्ची वरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केले होते. ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्यावर्षी एम एम आर डी ए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती. याहीवर्षी बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली जाणार. शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार. महत्त्वाचे म्हणजे याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असे भावनिक आवाहन शिवसैनिकांकडे केले होते. 


शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा पार पडत आहे. ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचा हा दसरा मेळवा नाही तर शिमगा मेळावा आहे, ते त्यातून नुसता इतरांच्या नावाने शिमगा करणार अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केली आहे. दरम्यान पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा असून त्यांच्या धनुष्यातून कोणता बाण सुटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि शिंदे गटाने वेगळा सवतासुभा मांडला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगामध्ये पक्ष आणि चिन्हाचा वाद जिंकला आणि शिवसेना हा पक्ष आपलाच असल्याचं सिद्ध केलं. त्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बाणाला अधिक धार आली आहे यात काही शंका नाही. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या पुढील वर्षी होणार असून त्या पूर्वीचा हा मेळावा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे राज्यातील आपल्या कार्यकर्त्यांना आणि साथीदारांना कोणता संदेश देणार याचीही उत्सुकता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.