एक्स्प्लोर

'15 वर्षांआधी माझ्या नवऱ्यानं कानाखाली लगावली नसती तर...' मराठीवरुन शर्मिला ठाकरे आक्रमक 

पंधरा वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याने (राज ठाकरे) Raj Thackeray  कानाखाली लगावली नसती तर आजही आपल्याला तेच चित्र पाहायला मिळालं असतं, असं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी म्हटलं आहे.

मुंबई : जर पंधरा वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याने (राज ठाकरे) Raj Thackeray  कानाखाली लगावली नसती तर आजही आपल्याला तेच चित्र पाहायला मिळालं असतं, असं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी म्हटलं आहे.  मराठी राजभाषा दिनाच्या (Marathi Bhasha Din) दिवशी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचे संबोधन केले. महाराष्ट्रात जर मराठी पाट्यांसाठी कोणाच्या काचा, दुकाने फोडावे लागत असतील तर ते लज्जास्पद आहे, असे यावेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्या. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, पंधरा वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याने आणि तुम्ही एक कानाखाली लगावली तर आज मुंबईत सगळ्यांना मराठी येतं. तुम्ही प्रयत्न करा, मी सगळीकडे मराठीत बोलते. मी अमेझॉन, पिझ्झावाल्याला फोन केला तर मराठीतच बोलते. तुम्ही त्यांच्या देशात, राज्यात गेलात तर त्यांच्या भाषेत बोला पण आपल्या महाराष्ट्रात आपण मराठीतच बोलायला हवं, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. 

15 वर्षापूर्वींची कानाखाली लावलेली आजवर लक्षात आहे. सगळे मराठी बोलतात. सगळे पटापट मराठी शिकले. मराठी येत नाही असं ते दाखवतात, त्यामुळं तुम्ही मराठीतच बोला असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

या कार्यक्रमात 11 कर्तृत्ववान मराठी महिलांचा गौरव देखील करण्यात आला. मराठी भाषा दिन म्हणून आजच्याच दिवशी नाही तर वर्षाचे 365 दिवस मराठीतच बोलले पाहिजे आणि यापुढे सर्व नागरिकांनी मराठीतच बोलावे असे आवाहन महिला मनसे पदाधिकाऱ्यांना शर्मिला ठाकरे यांनी केले. 

शर्मिला ठाकरे यांना युवराज संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी गरज असलेल्या आमरण उपोषणा बाबत विचारले असता, समाजात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण दिले पाहिजे असे देखील आरक्षणाच्या मुद्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर लता दिदींच्या स्मारकापेक्षा त्यांच्या आठवणीत मोठे संगीत विद्यापीठ सुरू करावे असे मत यावेळी शर्मिला ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget