मुंबई: अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं असून त्यांच्या घराची झडती घेण्यात येत असल्याची माहिती आहे. यावेळी या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात येत असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेण्याचं काम पोलीस करत आहेत. ही झडती सुमारे सात ते आठ तासांपासून सुरू असल्याचं सांगितलं जातंय.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भेटायला यापैकी कोणी एसटी कर्मचारी आला होता का किंवा इतर स्वरुपाची माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे काम मुंबई पोलीस करत आहेत. 


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सोमवारी दोन दिवसांची पोलीस कस्टडी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात एखादा सबळ पुरावा शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत आहेत. 


दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देण्याचा आरोप असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच्या इतर 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन केल्याप्रकरणी एकूण 110 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: