एक्स्प्लोर
Advertisement
शहापूरमधील राष्ट्रवादीच्या आमदाराचा शिवसेनेत प्रवेश
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला.
मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. 1980 पासून पवार कुटुंबासोबत असलेल्या शहापूरमधील बरोरा कुटुंबाने अखेर पक्षासोबत फारकत घेतली. बरोरा उद्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बरोरा यांची जवळीक असल्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे.
माझा उद्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. मोदी लाटेत मी निवडून आलो. स्थानिक राजकारण गलिच्छ होतं. आपली खूप कोंडी करण्यात आली. मी वरिष्ठांपर्यंत माझी कोंडी पोहचवली नव्हती, असं बरोरांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं.
गेल्या वेळी निवडणुकीच्या काही दिवस आधी तिकीट दिलं होतं. आता माझा परफॉर्मन्स पाहून मला इतर पक्षांकडून ऑफर येत आहेत. त्यामुळे मी निर्णय घेतला, असं पांडुरंग बरोरा यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रकल्पांसाठी मदत केली होती. शिवसेना ही पक्ष संघटन म्हणून चांगली असल्यामुळे आपण सेनेत प्रवेश करत आहोत, असंही बरोरा यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement