एक्स्प्लोर
Advertisement
IAS मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांना जुळ्या मुली
एकुलता एक मुलगा मन्मथ म्हैसकरच्या आत्महत्येनंतर आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलींना जन्म दिला
मुंबई : मुलाच्या आत्महत्येनंतर म्हैसकर कुटुंबात आलेला रितेपणा काहीसा दूर होताना दिसत आहे. आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या घरी जुळ्या मुलींचं आगमन झाल्याचं वृत्त आहे. म्हैसकरांचा 18 वर्षीय मुलगा मन्मथने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती.
आयव्हीएफ तंत्रज्ञान (कृत्रिम गर्भधारणा) च्या मदतीने मनिषा म्हैसकर यांनी मुंबईत जुळ्या मुलींना जन्म दिला. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. वयाच्या 49 व्या वर्षी मनिषा म्हैसकर यांना पुन्हा मातृत्वसुख लाभलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरोगेट मदरच्या माध्यमातून म्हैसकर कुटुंबात दोन चिमुकल्या जन्मल्या.
50 वर्षीय मिलिंद म्हैसकर म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत, तर मनिषा म्हैसकर नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.
डिसेंबर 2017 मध्ये म्हैसकर दाम्पत्याने पुन्हा एकदा पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याविषयी म्हैसकर दाम्पत्याच्या निकटवर्तीयांनाचा माहिती होती. देवाचे आशीर्वाद आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळेच आपली रिती ओंजळ भरल्याच्या भावना मनिषा यांनी व्यक्त केल्या.
18 जुलै 2017 रोजी मनिषा आणि मिलिंद यांचा एकुलता एक मुलगा मन्मथने आत्महत्या केली होती. मित्राला भेटायला जात असल्याचं सांगून तो घराबाहेर गेला. मात्र तो थेट मलबार हिल परिसरात असलेल्या नेपियन सी रोडवरील दरिया महल इमारतीवर गेला आणि तिथून खाली उडी मारुन त्याने जीव दिला होता.
संबंधित बातम्या :
दुहेरी हत्याकांडात लेक गमावलेल्या दाम्पत्याला जुळं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
Advertisement