एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांकडून 1767 कोटींची जमीन 3 कोटीत बिल्डरला : काँग्रेस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्ताने नवी मुंबईतील एक हजार 767 कोटी रुपयांची जमीन बिल्डरला तीन कोटींमध्ये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला.

मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मोठा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल एक हजार 767 कोटी रुपयांची असल्याचा दावा काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. सिडकोच्या ताब्यातील जागेची किंमत तब्बल एक हजार 767 कोटी रुपये असताना ती फक्त तीन कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मुंबईत काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले. यावेळी संजय निरुपम, पृथ्वीराज चव्हाण, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी हे नेते उपस्थित होते. कोयना धरणाच्या आठ प्रकल्पग्रस्तांना दिलेली 24 एकर जमीन प्रति एकर 15 लाख दराने बिल्डरने विकत घेतली. यामध्ये मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचंही काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले. हे बिल्डर भाजपचे विधानपरिषद आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांचे जवळचे मित्र असल्याचं सांगत ते भागीदारही असण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. 14 मे रोजी या जमिनीचं हस्तांतरण झालं. त्याच दिवशी जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी बिल्डर्सना मिळाली. या प्रक्रियेला दीड वर्ष लागत असताना 24 तासात हे कसं शक्य झालं, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादानेच हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. फडणवीस हे 'क्लीन चिट मिनिस्टर' असून सर्वांना 'क्लीन चिट' देत असल्याचं सुरजेवाला म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Mumbai Robbery : पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी महिलांची 97.50 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आझाद मैदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पोलीस असल्याची बतावणी करून परदेशी महिलांची 97.50 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आझाद मैदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Embed widget