Sanjay Raut: इकडं मुंबई महापौरपदासाठी ठाकरे गटातून भास्कर जाधवांची थेट शिंदेंना साद अन् संजय राऊत कडाडले! तिकडं शिंदे सुद्धा 'मनसे' बोलले..
बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला. भाजपला सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पैशाचा वापर करून, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut: जर बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून मुंबईचा मराठी महापौर होईल, असे थेट वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एवढे वाईट दिवस आले नाहीत, म्हणत भास्कर जाधव यांच्या वक्तव्याला महत्व दिलं नाही.
एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाहीत
एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्याबाबतच्या भूमिकेवर ते म्हणाले की, आम्ही शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. एवढे शिवसेनेवर वाईट दिवस आलेले नाहीत. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही.
बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं. आता मोदी एकनाथ शिंदेंकडून ऊर्जा प्रेरणा मार्गदर्शन घेतात का असा लोकांच्या मनात एक प्रश्न आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिलं आणि त्याच बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही फोडलात. शिवसेनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात पक्ष ठेवला. बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला. भारतीय जनता पक्षाला सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
दरम्यान, यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्यांनी 2022 मध्ये बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा केली आणि जनतेने दिलेल्या कौलाच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले, त्यांच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही. भाजपसोबतची युती ही बाळासाहेब ठाकरे, अटलजी आणि अडवाणीजी यांच्या काळातील जुनी आणि वैचारिक युती आहे. कोणाच्याही प्रस्तावाची गरज नसून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पनवेल या सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल, असे त्यांनी सांगितले. आमचा अजेंडा खुर्ची आणि सत्ता हा नसून मुंबईकरांना काय देणार आहोत हा आहे, असे म्हणत त्यांनी जाधवांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले.
दुसरीकडे, मुंबई महापालिका निवडणुकीत बाजी मारलेल्या भाजप-शिवसेना शिंदेंच्या पक्षांमध्ये पालिकेतील महत्वाच्या पदांबाबत अंतिम वाटाघाटी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून भाजपकडे महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी केली जात आहे.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप - 89
शिवसेना ठाकरे गट - 65
शिवसेना - 29
काँग्रेस - 24
मनसे - 6
एमआयएम- 8
एनसीपी - 3
एसपी - 2
एनसीपी शप - 1
————-
एकूण- 227
इतर महत्वाच्या बातम्या























