मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री चाकू हल्ला झाला आहे. सैफ अली खानवर तीक्ष्ण अशा चाकू हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वांद्रे येथील राहत्या घरी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या सैफ अली खानची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. चोरीचा उद्देश होता की आणखी काही याबाबत माहिती घेतली जात आहे. या प्रकरणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ही दुर्दैवी घटना आहे, महाराष्ट्रात आणि मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल. मुंबईत वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांच्या ऑफिसबाहेर घटना झाली. भायखळ्यात घटना झाली, दुर्दैवानं घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. लोकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जरब नाही. फार वाईट परिस्थिती आहे. गृह विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे, एखादी व्यक्ती घरात घुसते आणि त्याच्यावर वार करते. मुंबईचे पोलीस स्कॉटलँड पोलिसांनंतर दुसऱ्या क्रमांकाचं मानलं जातं. अशा घटनांवेळी प्रश्न निर्माण होतो मुंबई पोलीस काम करतात का? आयक्तालय काम करतंय, पोलीस महासंचालक काम करतंय का? गृहविभाग काम करतोय का? असा सवाल आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं, गुन्हे होत आहेत. आता लोकं खुलेपणानं फिरायला लागलेले आहेत. कोयते घेऊन फिरतायत, चाकू घेऊन फिरतायत, बंदुका घेऊन फिरतात, घरात घुसून मारत आहेत, महाराष्ट्रात काय चाललं आहे, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.
मधल्या काळात सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला, बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला, प्रतिष्ठीत व्यक्ती ज्यांना सुरक्षा आहे त्या व्यक्ती सुरक्षित नसतील तर सामान्य व्यक्तींचं काय? असा सवाल आहे. गुन्हेगार मंत्रालयात येऊ रील करतात काय चाललंय महाराष्ट्रात, असा सवाल वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दुर्दैवानं पोलिसांचा धाक दिसत नाहीये, उच्चभ्रू जागा आहेत त्या ठिकाणी हे घडतंय. बाबा सिद्दीकींवर हल्ला, सलमान खानच्या घराबाहेरील हल्ला दिवसा झाला होता. मुंबई पोलिसांचं देखील खच्चीकरण सुरु असल्याचं पाहायला मिळतं. महाराष्ट्रात सातत्यानं अशा घडत आहेत, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं. मुंबईत व्हीआयपी लोकं सुरक्षित नसतील तर सर्व सामान्य आणि झोपडपट्टीत काय स्थिती असेल, असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी केला.
इतर बातम्या:
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया