Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात घुसलेल्या चोरानं चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी चोरानं पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. त्याला तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. या गोंधळात चोरानं पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 


अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करिना कपूर वांद्रे येथे राहतात. त्यांच्या घरात रात्री एक चोर शिरला. सैफ-करिनाच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चोर शिरल्याची चाहुल लागली. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर सैफ अली खानला जाग आली. त्यानंतर सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाली आणि या झटापटीत सैफवर चोरानं चाकूनं वार केले आणि तिथून पळ काढला. 


पोलिसांकडून CCTV फुटेजची तपासणी


पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळताच, त्यांनी सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सैफच्या आसपासच्या परिसरात दोन ते तीन सीसीटीव्ही आहे. गेटवरही सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा माग घेण्यास सुरुवात केली आहे. चोरानं घरात शिरण्यापूर्वी घराची रेकी केली असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 


दरम्यान, चोरानं केलेल्या हल्यात सैफ अली खान जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. पण, अद्याप सैफ अली खानच्या कुटुंबियांकडूनही कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. 


सैफची प्रकृती कशी? 


सैफ अली खानला सध्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या निवेदनानुसार, सैफ अली खानला पहाटे 3 ते 3.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी अभिनेत्याला 6 जखमा झाल्या होत्या. त्यापैकी एक त्याच्या मणक्याच्या अगदी जवळ होती." लीलावती हॉस्पिटलचे सीईओ नीरज उत्मानी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, "सैफ अली खान यांना पहाटे 3 ते 3.30 वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. त्याला सहा जखमा झालेल्या, त्यापैकी दोन गंभीर आहेत. एक दुखापत त्यांच्या मणक्याजवळ आहे."


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानवर तब्बल अडीच तास ऑपरेशन सुरू होतं. सैफवर अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं सहा वेळा हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली होती. तर, चाकूचा एक छोटासा भाग सैफच्या पाठीतून शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला होता. पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्यामुळे तातडीनं ऑपरेशन करावं लागल्याची माहिती मिळत आहे. 


करिना कपूर खान काय म्हणाली? 


करिना कपूर खान म्हणाली की, "काल रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली होती, ज्यासाठी तो रुग्णालयात आहे, त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकृती ठीक आहे. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी धीर धरावा आणि पोलीस प्रकरणाची योग्य चौकशी करत असल्यानं कुणीही अधिक आणि चुकीचे अंदाज लावून गैरसमज पसरवू नयेत. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार."


दरम्यान, सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी सैफ 'देवारा पार्ट 1' मध्ये झळकला होता. कोराताला शिवा दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर यांनी भूमिका साकारल्या होत्या. यानंतर, जयदीप अहलावतसोबत 'ज्वेल थीफ'मध्येही सैफ झळकणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होईल.


पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Security : सैफच्या महिला मतनीसाने अज्ञाताला घरात घेतलं, नेमकं घडलं काय?



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Saif Ali Khan Injured: सैफच्या मानेवर 10 सेमीची जखम, हातावर 10 वार, पाठीत धारदार शस्त्रही खुपसलं; मध्यरात्री 2 वाजता नेमकं काय घडलं?