मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आले आहेत, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी निदर्शनं करण्याचा इशारा दिला होता. काँग्रेस नेत्यांकडून माफी मागा मोदीजी असं आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र, आज सकाळ पासून काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी घरीच रोखून धरले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगताप, अस्लम शेख यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलंय. मोदी जोपर्यंत मुंबईबाहेर जात नाहीत तोपर्यंत या नेत्यांना न सोडण्याची पोलिसांची भूमिका आहे. या सर्व प्रकरणावर काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला निडरपणा छत्रपती शिवरायांनी शिकवला असल्याचं म्हणत राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत.  


सचिन सावंत काय म्हणाले?


महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं बदनामी करण्यात आलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कुणाच्या हातानं करण्यात आलेले होतं? पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं, एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्राची जनता आहे, त्यांच्या ह्रदयावर घाव घालणारी घटना आहे. हे पाप भाजपचं, महायुतीच्या सरकारचं आहे, असं सचिन सावंत म्हणाले. जनसामान्यांचं संरक्षण करता येत नाही, चार चार वर्षांच्या मुलींवर बलात्कार होतो आणि तिथं आरोपींना पाठिशी घालण्याचं काम होतं.  आज आमच्या कार्यकर्त्यांना घरातून उचललं आहे.आमच्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना स्थानबद्ध केलं गेलंय. रस्ता बंद करुन ठेवलं गेलं आहे. हा महाराष्ट्र आहे की काय चाललंय, नेत्यांना घराबाहेर पडू  देत नाही, जनतेला देखील बाहेर पडू देत नाहीत. 


देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आणि इथं तुमची ही अवस्था करुन ठेवली लोकांनी मी मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारतो. तुम्ही साधं निषेध आंदोलन करु देणार नाही. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला. 


आम्हाला निडरपणा शिवरायांनी शिकवला हे लक्षात ठेवा एकनाथ शिंदे, असं सचिन सावंत म्हणाले. एका महिलेला थांबवण्यासाठी काय सुरु आहे. इतकं घाबरतंय सरकार, इतके मोदीजी घाबरले, तुमच्याकडे देशाची , महाराष्ट्राची सत्ता आहे. डबल इंजिन लावलंय, आमच्या कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलीस मागं लागलेत. पण कुठं गेला जयदीप आपटे याचं उत्तर द्याव असं सचिन सावंत म्हणाले. 


आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. या देशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे. हा निडरपणा शिवरायांनी शिकवलेला आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, तो मोदींचा नाही, असं सचिन सावंत म्हणाले.


8



इतर बातम्या :


Vadhavan Port : वाढवण बंदराच्या कामाला मच्छीमारांचा विरोध, डहाणूत बोटींवर काळे फुगे लावत समुद्रात निषेध रॅली