सिंधुदुर्ग : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 9 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या मुद्द्यावरुन राजकीय नेतेमंडळी आमने-सामने आली आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत, अशातच राजकोट किल्ल्यावर बुधवारी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि राणे पुत्र समोरासमोर आल्यामुळे तणाव वाढला होता. त्यावेळी, तेथे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणावरुन काल शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नितेश राणे (Nitesh Rane) आणि पुतळा बनवणाऱ्या आपटेचा फोटो दाखवला. आता, नितेश राणे यांनी पलटवार करत, आपटेला आम्ही आपटणार असल्याचं म्हटलं आहे, त्यानंतर आता सोशल मिडियावरती नितेश राणे आणि जयदीप आपटेचे (Jaideep Apte) जुने फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. 


कणकवली येथे आप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा बसवण्यात आला. तो पुतळा जयदीप आपटे याने कल्याण येथील त्यांच्या कार्यशाळेत बनवला होता. हा पुतळा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या समवेत जयदीप आपटे (Jaideep Apte) यांनी कणकवली मध्ये सुपूर्त केला. नितेश राणे जयदीप आपटे याच्यावर टीका करतात मात्र नितेश राणे आणि जयदीप राणे एकाच मंचावर आप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा सुपूर्त कार्यक्रमात एकत्र दिसून येत आहेत. त्यामुळे आता नितेश राणे यांनी आपटेला आम्ही आपटणार असं म्हटलं खरं पण दुसरीकडे हे फोटो सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.


कणकवली येथे 2019 साली आप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा बसवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तो पुतळा जयदीप आपटे याने कल्याण येथील त्यांच्या कार्यशाळेत बनवला होता. हा पुतळा आमदार नितेश राणे यांच्या समवेत जयदीप आपटे यांनी कणकवली मध्ये सुपूर्त केला. नितेश राणे जयदीप आपटे (Jaideep Apte) याच्यावर टीका करतात मात्र नितेश राणे आणि जयदीप आपटे हे एकाच मंचावर आप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा सुपूर्त कार्यक्रमात एकत्र दिसून येत आहेत. 


सुषमा अंधारेंनी नितेश राणेंचे जयदीप आपटेसोबतचे दाखवले फोटो 


ज्या आपटेबाबत बोललं जातं तो आपटे तो सनातन प्रभातशी संबध आहे, या माणसाची मुलाखत ही यामध्ये दिलं आहे, जो माणूस दीड फुटाचा पुतळा उभा करू शकतो त्याला इतकं मोठं काम कसं दिलं. त्याचं काम दिड फुटापेक्षा कमी उंचीचे पुतळे उभे करमं होतं त्याला इतकं मोठं काम कसं दिलं गेलं, का दिलं याच्या खोलात गेलो तेव्हा समजतं हा जयदीप आपटे (Jaideep Apte)सोबत नितेश राणे दिसत आहेत. जयदीप आपटे आणि नितेश राणे यांचा कोणता दोस्ताना घरी कोण नसताना आहे, हे सांगितलं गेलं पाहिजे. आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती असल्यानेच सिंधुदुर्गातील मालवण मध्ये पुतळा उभा करायचा आहे, जिथे निलेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागत आहेत तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं. काय संदर्भ आहे, ये रिश्ता क्या कहलाता हैं यांच्यावर उत्तर फडणवीसांनी द्यायला पाहिजे असंही अंधारेंनी म्हटलं आहे.