मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडातर्फे (MHADA) मुंबई मंडळातील 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे. राज्य सरकारने सोडतीतील या घरांची किंमत सधारण 10 ते 25 टक्क्यांनी केली आहे. या निर्णयानंतर सरकारने या सोडतीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीतही 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता म्हाडाची लॉटरी नेमकी कधी काढली जाईल असे विचारण्यात येत होते. आता याच घरांची लॉटरी जाहीर करण्यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. 


घर मिळाले की नाही? कधी समजणार?


राज्य सरकारने 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली आहे. या मुदतवाढीनंतर कोणाला घरे मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ही लॉटरी कधी जाहीर होणार याचीही विचारणा होऊ लागली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आथा मुदतवाढीनंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लॉटरी जाहीर करण्यात येईल. म्हणजेच म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे की नाही, सोडतीत नंबर लागलेला आहे की नाही हे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात समजून येईल.


म्हाडाने घरांची किंमत केली कमी?


म्हाडाने मुंबई मंडळातील 2030 घरांची सोडत जाहीर केल्यानंतर ही घरे खूप महाग आहेत, अशी तक्रार केली जात होती. एवढी महागडी घरे कोण घेणार? असा सवाल केला जात होता. त्यानंतर म्हाडाच्या सोडत प्रक्रियेला अधिक प्रतिसाद लाभावा तसेच लोकांना कमी किमतीत घरे मिळावीत यासाठी म्हाडाकडून घरांची किंमत कमी करण्यावर वचार केला जात होता. आता म्हाडातर्फे ही घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त केली आहेत. या निर्णयानंतर आता 62  लाखांचं घर 50 लाख तर 39 लाखांचं घर 29 लाखांत मिळणार आहे. खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या 370 घरांच्या किमतीही कमी झालेल्या आहे.


मुंबईत कोणत्या भागात घरं? किती अर्ज आले?


दरम्यान, मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या भागात म्हाडाची ही घरे आहेत. सध्या म्हाडाकडे या सोडतीसाठी 22 हजार 400 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांपैकी 14 हजार 839  अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे. 


हेही वाचा :


Cidco Lottery : म्हाडाकडून घरांसाठी अनामत रक्कम 10 हजारांपासून सुरु, सिडकोच्या घरांसाठी डिपॉझिट किती रुपये भरावे लागणार?


मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?