एक्स्प्लोर

रोहित पवार आणि अमित ठाकरे यांची भेट, सव्वा तास चर्चा

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मुंबईतील फिनिक्स मिल कंपाऊंडमधील इंडिगो हॉटेलमध्ये एकत्र जेवण घेतलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. विविध पक्षांचे दिग्गज नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतानाच दोन पक्षांमधले युवा चेहरेही एकत्र येताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांची मुंबईत भेट झाली. एकीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वाढदिवशी कोणासोबत 'डिनर डेट' करणार, याची चर्चा रंगलेली असताना अमित आणि रोहित यांची 'लंच भेट' झाली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेचं जमलेलं गूळपीठ आपल्यासाठी नवीन नाही. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट ताजी असतानाच अमित ठाकरे आणि रोहित पवार एकमेकांना भेटले. मुंबईतील फिनिक्स मिल कंपाऊंड मधील इंडिगो हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र जेवण घेतलं. विशेष म्हणजे आजच सकाळी रोहित पवार यांनी फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरेंनी तात्काळ होकार दिल्यामुळे दुपारी दीड वाजताच्या सुमारास अमित आणि रोहित यांची भेट झाली. दोघांमध्ये जवळपास सव्वा तास गप्पा रंगल्या. VIDEO | रोहित पवारसोबत कुठलंही वैर नाही, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध : सुजय विखे ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं, तरी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेले असताना राजकारणापासून दूर असलेले, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठ्या घराण्यांमधले तरुण चेहरे एकमेकांना भेटत असल्यामुळे ही नव्या समीकरणांची नांदी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोकसभा निवडणुकीला मनसेला राष्ट्रवादीसोबत आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती, असं म्हटलं जातं. काँग्रेसने खोडा घातल्यामुळे हे समीकरण बिघडलं असलं, तरी राज ठाकरेंनी सभा घेत आघाडीला अप्रत्यक्ष मदत केली होती. आता विधानसभेला काँग्रेसने वेगळा मार्ग निवडला , तर राष्ट्रवादीला मनसे हात देऊ शकते. यासाठीच सर्व स्तरावर जुळवाजुळव सुरु असल्याचं दिसत आहे. रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. बारामती अॅग्रो लिमिटेडचे ते सीईओ असून भारतीय साखर कारखान्यांच्या असोसिएशन (इस्मा)चे ते अध्यक्ष आहेत. रोहित हे राजेंद्र पवारांचे पुत्र, म्हणजेच शरद पवारांचे नातू, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident: पहाटे 5 ची वेळ, बीएमडब्ल्यूचा ताशी 100+ स्पीड अन् 3 बळी! मुंबई कोस्टल रोडवरील भीषण अपघातामागचं 'सायन्स' काय?
पहाटे 5 ची वेळ, बीएमडब्ल्यूचा ताशी 100+ स्पीड अन् 3 बळी! मुंबई कोस्टल रोडवरील भीषण अपघातामागचं 'सायन्स' काय?
Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Accident CCTV Footage: कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
Mumbai News: कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
Solapur News : दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
Asian Games 2026 : आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
Smriti Mandhana News : स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
Radhakrishna Vikhe Patil on Nila Vikhe Patil: महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’
महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’
Shafali Verma News : शेफाली वर्माने वादळी खेळीने इतिहास-भूगोल बदलून टाकला! टी-20 क्रिकेटमधील 6 मोठे विक्रम मोडले
शेफाली वर्माने वादळी खेळीने इतिहास-भूगोल बदलून टाकला! टी-20 क्रिकेटमधील 6 मोठे विक्रम मोडले
Embed widget