एक्स्प्लोर

ओला-उबेरच्या मनमानी भाडेआकारणीला बसणार चाप! भाडेनिश्चितीचा फॉर्म्युला ठरला

ओला-उबेर सारख्या मोबाईल अॅपवर आधारीत टॅक्सींबाबत राज्य सरकारचा भाडेनिश्चितीचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. मनमानी भाडेआकारणीला चाप बसवण्यासाठी खटुआ कमिटीच्या शिफारशींनुसार आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिलीय.

मुंबई : ओला-उबेर सारख्या मोबाईल अॅपवर आधारीत टॅक्सींबाबत राज्य सरकारचा भाडेनिश्चितीचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. मोबाईल अॅपवरील टॅक्सींच्या मनमानी भाडेआकारणीला चाप बसवण्यासाठी खटुआ कमिटीच्या शिफारशींनुसार हा आराखडा तयार केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे हायकोर्टात देण्यात आली. याच्या अंमलबजावणीला लवकरच सुरुवात होणार असली तरी येत्या सहा एप्रिलपर्यंत ओला-उबेर चालकांवर कोणताही कारवाई करण्यात येणार नाही, अशी माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली. यासंदर्भात निवृत्त सनदी अधिकारी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची एक समिती तयार केली होती. या समितीनं नोव्हेंबर 2017 रोजी आपला अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र, आजतागयत त्यावर कोणताही निर्णय झालेला नव्हता. राष्ट्रीय परवानाधारक टॅक्सी चालकांना मुंबई शहर प्राधिकरणाच्या विभागात स्थानिक परवान्याशिवाय टॅक्सी चालवण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अली रझ्झाक हुसैन आणि इतर पाच अॅपवर आधारीत टॅक्सी चालकांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर न्यायमूर्ती अमजद सैय्यद आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. अॅपवर चालणाऱ्या राष्ट्रीय परवानाधारक टॅक्सी चालक आणि मालकांना स्थानिक परवाना मिळवण्यासाठी काळी-पिवळी टॅक्सी चालकांच्या तुलनेत 10 पट पैसे मोजावे लागत आहेत, अशी माहिती या याचिकेत देण्यात आली आहे. ओला आणि उबरमुळे ऑटो क्षेत्रात मंदी : निर्मला सीतारमण ओला उबेरची मक्तेदारी आणि मनमानी कारभार खपवून घेणार नाही मोबाईल अॅपवर आधारीत टॅक्सीमध्ये ओला उबेरची मक्तेदारी आणि मनमानी कारभार खपवून घेणार नाही. काळी-पिवळीचं अस्तित्त्व संपवण्यासाठी अॅपवर आधारीत टॅक्सी कंपन्या वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटिजी वापरत आहेत. मात्र, समाजाच्या हितासाठी लवकरच ओला आणि उबेरसारख्या टॅक्सींवरही लगाम लावणार असल्याचं राज्य सरकारनं यापूर्वी हायकोर्टात स्पष्ट केलं होतं. 'ओला'च्या बिझनेस मॉडेलला मोठा धक्का, सोलापुरात ओला बाईक्सवर कारवाई शहरी भागांत प्रवाश्यांची नेआण करणाऱ्या सर्व टॅक्सी चालकांकडे वैध परवाना असणं बंधनकारक असेल. त्याचबरोबर प्रवाश्यांकडून भाडं वसूल करताना ते प्रमाणित टॅक्सी मीटरद्वारे असणं बंधनकारक आहे. त्यामुळे ओला-उबेरकडून ऐन गर्दीच्यावेळी एक आणि इतर वेळ एक अश्याप्रकारे प्रवाश्यांकडून होणारी भाडेवसूली गैर असून त्यावर लवकरच राज्य सरकारकडून नियंत्रण आणलं जाईल असही सांगण्यात आलं होतं. राज्य सरकारच्या या नियमावलीला आव्हान देण्याऱ्या अॅपधारक टॅक्सी चालकांना त्यांच्यावर कुणाचच बंधन नकोय. मात्र, ते शक्य नाही, कारण ओला-उबेर मोबाईल अॅपवर जरी आधारीत असल्या तरी त्या राज्य परिवहनविभागाच्याच अखत्यारीत आहेत असही राज्य सरकारनं याआधी स्पष्ट केलंय. Mumbai Taxi | मुंबईतील टॅक्सींवर प्रवाशांच्या सोयीकरता तीन रंगाचे दिवे | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget