एक्स्प्लोर
Advertisement
दाऊदला कॉल प्रकरणी खडसेंना पोलिसांचा दिलासा
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी वारंवार संपर्क केल्याबाबत झालेल्या आरोपांप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पोलिसांनी दिलासा दिला आहे. 'आप'च्या प्रीती मेनन यांनी खडसेंच्या ज्या नंबरचा उल्लेख करुन आरोप केला, त्यावरुन सप्टेंबर 2015 ते एप्रिल 2016 दरम्यान कोणताही इनकमिंग किंवा आऊटगोईंग कॉल झाला नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
प्रीती मेनन यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर दाऊदशी संभाषण झाल्याचा आरोप केला होता. मात्र मुंबई क्राईम ब्रान्चने चौकशी केली असता मेनन यांनी उल्लेख केलेल्या फोनवरुन दाऊदच्या कथित नंबरवर फोन झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं.
मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीम एकनाथ खडसेंच्या संपर्कात होता की नव्हता याची पूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरुन दूर करावं, अशी मागणी आप नेत्या प्रीती मेनन यांनी केली आहे. 'दाऊदची पत्नी मेहजबीन हिच्या नंबरवरुन खडसेंच्या 9423073667 या नंबरवर सातत्यानं संपर्क केला जात होता. तसे पुरावे गुजरातचा एथिकल हॅकर मनीष भंगाली याने तपास यंत्रणांना दिली' असं त्या म्हणाल्या.
त्यानंतरही खडसेंनी आपला कथित नंबर 1 वर्षापासून बंद असल्याचं म्हटलं होतं. मात्र प्रीती मेनन शर्मा यांनी खडसेंच्या 'त्या' मोबाईल नंबरची लेटेस्ट बिलंच पत्रकार परिषदेत सादर केली.
संबंधित बातम्या :
खडसेंचा राजीनामा घेऊन चौकशी करा: प्रीती मेनन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement