मुंबई :  रिलायन्स उद्योग समूहाच्या सर एचएन रिलायन्स फाउंडेशन (Sir H.N. Reliance Foundation) आणि धिरुभाई अंबानी इंटरनॅशनलने (DhirubhaiAmbani International School) प्रतिष्ठित टाईम्स ऑफ इंडिया रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. 


टाईम्स ऑफ इंडिया स्कूल सर्व्हे 2021
टाईम्स ऑफ इंडियाने मुंबईतील अव्वल शाळांची माहिती समोर आणण्यासाठी हा सर्व्हे केला आहे. स्कूल सर्व्हेमध्ये धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला पुन्हा एकदा सर्वश्रेष्ठ स्कूलचा दर्जा मिळाला आहे. या स्कूलचे व्यवस्थापन निता अंबानी यांच्याकडे आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि प्रयत्नांचे हे यश आहे. 




आरोग्य सर्व्हे
टाईम्स ऑफ इंडियाच्या आरोग्य सर्व्हेमध्ये सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने आपले अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. या सर्व्हेचा उद्देश मुंबईतील अव्वल मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटल्सची यादी तयार करणे असा होता. या यादीत किमान तीन किंवा अधिक विशेष कक्ष असलेल्या हॉस्पिटल्सचा समावेश होता. यामध्ये ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजी, यूरोलॉजी, कार्डियोलॉजी, बाल रोग, स्त्री रोग / प्रसूती, न्यूरोलॉजी, आपातकालीन आणि गैस्ट्रोएंटरोलॉजी  किंवा हेपेटोलॉजी या विभागांचा समावेश होता. 


रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन निता अंबानी यांनी सांगितलं की, टाईम्स ऑफ इंडियाने घेतलेल्या मल्टी स्पेशलिटी सर्व्हे 2021 मध्ये सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला पश्चिम क्षेत्रात आणि मुंबई विभागात अव्वल स्थान पटकावलं आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. मानवतेसाठी निस्वार्थ सेवा आणि अथक प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर्स, हॉस्पिटलचे कर्मचारी आणि संपूर्ण टीमच्या कार्याला सलाम करत आहोत. 


संबंधित बातम्या :