Forbes List : या वर्षीच्या भारतातील 100 सर्वाधिक श्रीमंत लोकांची फोर्ब्ज लिस्ट (Forbes List of India's 100 Richest) जाहीर झाली असून या यादीत रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सलग 14 व्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) हे आहेत. कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, सामान्य माणूस रस्त्यावर आला असताना भारतीय उद्योगपतींची संपत्ती मात्र थोडकी नव्हे तर तब्बल 50 टक्क्यांनी वाढली असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या यादीत सर्वोच्च स्थानी रिलायन्सचे मुकेश अंबानी असून त्यांची संपत्ती 92.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असल्याचं फोर्ब्जने सांगितलं आहे. सन 2008 पासून मुकेश अंबानी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचा दुसरा क्रमांक असून त्यांची संपत्ती ही 74.8 अब्ज डॉलर्स असल्याचं फोर्ब्जने म्हटलं आहे.
गेल्या वर्षभराच्या काळात भारतातील टॉपच्या शंभर उद्योगपतींची संपत्ती तब्बल 257 अब्ज डॉलर्सनी वाढली असून ती 775 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या यादीतील 80 हून जास्त अब्जाधीशांची संपत्तीत या वर्षी भर झाली आहे तर 61 जणांच्या संपत्तीत एक अब्ज डॉलर्सहून अधिक भर पडली आहे.
फोर्ब्जच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत टॉप टेन अब्जाधीश कोण आहे हे पाहूयात,
1. मुकेश अंबानी - 92.7 अब्ज डॉलर्स
2. गौतम अदानी - 74.8 अब्ज डॉलर्स
3. शिव नडार - 31 अब्ज डॉलर्स
4. राधाकृष्ण दमानी - 29.4 अब्ज डॉलर्स
5. सायरस पुनावाला - 19 अब्ज डॉलर्स
6. लक्ष्मी मित्तल - 18.8 अब्ज डॉलर्स
7. सावित्री जिंदाल - 18 अब्ज डॉलर्स
8. उदय कोटक - 16.5 अब्ज डॉलर्स
9. पालनजी मिस्त्री - 16.4 अब्ज डॉलर्स
10. कुमार बिर्ला - 15.8 अब्ज डॉलर्स
संबंधित बातम्या :
- Hurun India : सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत, अदानींच्या संपत्तीत रोज 1002 कोटींची भर
- Hurun Global 500 : जगातल्या सर्वात मोठ्या 500 कंपन्यांमध्ये 12 भारतीय कंपन्यांचा समावेश, रिलायन्स 57 व्या स्थानी
- World's Biggest Philanthropist: ना बिल गेट्स, ना वॉरेन बफेट... गेल्या 100 वर्षातील जगातील सर्वात दानशूर व्यक्ती भारतीय