एक्स्प्लोर

RBI चे सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध, 6 महिन्यात 1 हजारच काढण्याची मुभा!

या निर्णयांनंतर रात्री उशिरा सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील गिरगाव शाखेसमोर पैसे मिळावेत म्हणून गोंधळ घातला.

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. यानुसार खातेदारांना सहा महिन्यात फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत. या निर्णयांनंतर रात्री उशिरा सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील गिरगाव शाखेसमोर पैसे मिळावेत म्हणून गोंधळ घातला. रिझर्व्ह बँकेने 17 एप्रिलला सिटी बँकेला पत्र पाठवून ठेवी घेण्यास आणि कर्ज देण्यास मनाई केली आहे. या सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या कोणत्याही व्यवहारासाठी आता रिझर्व्ह बँकेची लेखी परवानगी आवश्यकता असेल. आरबीआयची नोटीस सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या एकूण 10 शाखा आहेत. या बँकेला डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेकडून एक नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर 17 एप्रिलला या बँकेच्या सर्व बचत/सेव्हिं आणि चालू/करंट अकाऊंट सील करून बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले गेले. त्यामुळे आपले लाखो रुपये अडकल्याने लोकांनी बँकेबाहेर गर्दी केली. आम्हाला आमचे पैसे परत हवे, अशी मागणी खातेदारांनी केली. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे हे शक्य नसल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं. शिवसेना खासदार अध्यक्ष या बँकेच्या अध्यक्ष पदावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ हे आहेत. “बँक ेला पत्र येण्याआधीच आम्ही या बँकेचं दुसऱ्या बँकेत विलिनीकरणाचे प्रयत्न सुरु केले होते. काम पूर्ण झालं असून, काही दिवसात हे विलिनीकरण पूर्ण होईल. शिवाय कोणत्याही ग्राहकाने चिंता करु नये, कोणाचाही पैसा बुडणार नाही. प्रत्येकाचे पैसे या बँकेत सुरक्षित असून, बँकेवर 75 वर्ष जसा विश्वास ठेवला तसाच कायम असू द्या” असं आवाहन खासदार अडसूळ यांनी केलं. यासोबतच 2014-15, 2015-16 याकाळात महाव्यवस्थापक/ जनरल मॅनेजर रमेश शिरगावकर यांनी बेमालूमपणे काही अधिकाऱ्यांसोबत घेऊन अनेक व्यवहार केले. याची माहिती उशिरा कळल्याने आम्हाला या परिस्थीला तोंड द्यावे लागत असल्याचं अडसूळ यांनी सांगितलं. सिटी को ऑपरेटिव्ह बँकेचं भांडवल
  • सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या एकूण शाखा 10 आहेत
  • बँकेचे एकूण ठेवीदार - 91000
  • 13 हजार ठेवीदारांचे बँकेत 1 लाखांपेक्षा जास्त पैसे आहेत.
  • तर 18000 ठेवीदारांचे 1 हजारापर्यंत पैसे बँकेत आहेत.
विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, त्यासोबतच लग्न समारंभ यासाठी लागणारी 50 हजारापर्यंत रक्कम बँकेकडून रिजर्व्ह बँकेच्या परवानगीने मिळणार आहेत. बँकेवर निर्बंध जरी लागले तरी ठेवीदारांनी बँकेवर विश्वस ठेवावा. त्यांचे पैसे सुरक्षित असून बँकेचं विलिनीकरण झाल्यानंतर हा तिढा सुटेल, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget