एक्स्प्लोर

वांद्रे स्टेशनवर अन्नपदार्थांमध्ये उंदीर, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्टॉलधारकाला दंड

रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी मोबाईलमध्ये हा प्रकार शूट करण्यात आला आहे. रेल्वेकडे या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर स्टॉलधारक परमार सिंगला 10 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई : कुर्ला स्टेशनवरील सरबत तयार करण्याच्या व्हिडीओची घटना ताजी असतानाच आता वांद्रे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक भला मोठा उंदीर खाद्यपदार्थाच्या रॅकमध्ये फिरताना दिसून येत आहे. VIDEO | रेल्वे स्टेशनवरील अन्नपदार्थांच्या खाचेत उंदीर, वांद्रे स्थानकावरील प्रकार | मुंबई | एबीपी माझा प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या स्टॉलधारकाला पश्चिम रेल्वेने 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वांद्रे रेल्वे स्थानकातील फ्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील एका स्टॉलमधील अन्नपदार्थांमध्ये उंदीर आढळला असून तसा व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या स्टॉलवरील भेळ, चॉकलेट भरलेली बरणी आणि पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या काचेच्या बॉक्समध्ये उंदीर आढळला. रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी मोबाईलमध्ये हा प्रकार शूट करण्यात आला आहे. रेल्वेकडे या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर स्टॉलधारक परमार सिंगला 10 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. रेल्वे फलाटांवरील खुल्या सरबत विक्रीवर बंदी, मध्य रेल्वेचा निर्णय रेल्वे स्टेशनवर लिंबू सरबत किती गलिच्छ पद्धतीने तयार केलं जातं, हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेने आता नवा तोडगा काढला आहे. रेल्वेने खुल्या सरबत विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. यामध्ये केवळ लिंबू सरबतच नाही तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस यांसारख्या पेयांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. कुर्ल्यात हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 वर असलेल्या खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचं समोर आलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारावर तुफान टीका झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेने पाऊल उचलत खुल्या सरबत विक्रीवर बंदी घातली. परंतु सीलबंद पेयांची विक्री मात्र सुरुच राहणार आहे. मुंबई विभागातील रेल्वे स्टेशनवर 13 मे 2013 रोजी लिंबू सरबतच्या विक्रीला परवानगी मिळाली होती. या परवानगीनुसार स्थानिक पेयं आणि विविध सरबतं स्थानकांतील स्टॉलवर विकण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र सरबत परवानाधारकांकडून आरोग्याला घातक पद्धतीने बनवलं जात असल्याचं समोर आलं. शिवाय प्रवाशांच्या आरोग्याबाबत कोणतीही काळजी घेतली जात नाही, असं सांगत मध्य रेल्वेने खुल्या सरबत विक्रीच्या बंदीचा लेखी आदेश काढला होता. दरम्यान, मध्य रेल्वेने स्टेशनमधील स्टॉलवर खुल्या सरबत विक्रीला बंदी घातली असली तरी, पश्चिम रेल्वेच्या लोकल स्टेशनवर सरबत किंवा खाद्यपदार्थांबाबत कोणतीही तक्रार आली नाही, असं पश्चिम रेल्वेने म्हटलं होतं. मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व स्टॉलची नियमित पाहणी आणि तपासणी करण्यात येत असल्याचं पश्चिम रेल्वेने सांगितलं होतं. VIDEO | रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत पिणाऱ्यांनो सावधान

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget