एक्स्प्लोर
सेनेसोबत जाण्यासाठी गीतेंची जागा देण्याची उद्धव ठाकरेंची ऑफर होती: आठवले
मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर अन्याय झाला असून, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चूक होतं, असे मत मांडत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.
कन्हैया आणि रोहित वेमुला प्रकरण
कन्हैयाच्या कार्यक्रमात पाकिस्तान जिंदाबाद आणि अफझल गुरुच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, हे स्पष्ट झालं आहे. मात्र, घोषणा कन्हैयाने दिल्या की नाही, हे स्पष्ट नसताना त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चूक होते, असे मत रामदास आठवले यांनी मांडले. त्याचसोबत आठवलेंनी हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला प्रकरणावरही भाष्य केलं. "रोहित वेमुला प्रकरणाची चौकशी सुरु आहे. रोहितने आत्महत्या केल्यानंतर हैदराबाद विद्यापीठाला भेट देऊन, प्रकरणात तातडीने कारवाईची मागणी केली होती.", असे आठवले म्हणाले.
आंबेडकर भवन वाद
दादरमधील आंबेडकर भवन वादावर बोलताना आठवले म्हणाले, "आंबेडकर कुटुंबीयांना दुप्पट जागा देऊन वाद मिटवावा.". मात्र, यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेला आठवलेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. "मी माझा बंगला द्यायला तयार आहे. वरच्या मजल्यावर मी राहीन."
आठवलेंची कबुली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असा पक्ष अजून उभा करु शकलो नाही. मात्र, भविष्यात तसा पक्षा निर्माण करु, अशी कबुली आठवलेंनी यावेळी दिली. मात्र, मुंबई महापालिकेत रिपाइंच्या पाठिंब्याशिवाय कुणाचीही सत्ता येऊ शकत नाही, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement