एक्स्प्लोर

विधानपरिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी, रामदास आठवलेंची भाजपकडे मागणी

विधानपरिषदेची एक जागा रिपाइंला द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. एकूण 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे.

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या 9 पैकी 4 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. भाजपला जिंकता येणाऱ्या 4 जागांपैकी एक जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहे.

रिपब्लिकन पक्षाला विधानपरिषदेची एक जागा देऊन सामाजिक समतोल साधावा. रिपाइंला विधानपरिषदेची एक जागा दिल्यास त्यातून राज्यातील आंबेडकरी जनतेला ताकद देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्यातून चांगला सामाजिक संदेश जाईल. त्याची पुढील काळात भाजपलाही चांगली मदत होईल, असं सांगत रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे आरपीआयला एक विधानपरिषदेची जागा देण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक

भाजपकडून कोणाच्या नावांची आहे चर्चा? पंकजा मुंडे - भाजपचा आक्रमक ओबीसी चेहरा. विधानसभेत मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे मराठवाड्यात पुन्हा ताकद देण्याचा प्रयत्न. मागील पाच वर्षे ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण मंत्री म्हणून कामाचा अनुभव असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याची संधी. एकनाथ खडसे - राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चेला पूर्णविराम देत, मला राज्याच्या राजकारणात रस असल्याचं खडसे यांनी स्वतः स्पष्ट केलं होतं. विरोधी पक्ष नेते पदाचा दांडगा अनुभव. राज्यातील ओबीसी नेतृत्वाची मोट बांधून संघटनात्मक बळकटीसाठी अजूनही प्रभावीपणे काम करण्याची इच्छा. चंद्रशेखर बावनकुळे - उमेदवारी नाकारल्यामुळे तेली समाजाने विधानसभा निवडणुकीत पाठ फिरवली. नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय. माजी मंत्री म्हणून प्रशासनावर चांगली पकड. आर्थिक पाठबळ असलेला विदर्भाचा महत्वाचा नेता. विधानपरिषद निवडणूक | कुणाला किती जागा? 9 जागांसाठी अशी आहेत आकड्यांची गणितं हर्षवर्धन पाटील - इंदापूरमधून पराभूत झाल्यानंतर भाजपात सक्रिय राहण्यासाठी विधानपरिषदेत वर्णी. उत्तम संसदपटू आणि संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी सक्षम. पश्चिम महाराष्ट्रातील मोठा चेहरा. रणजितसिंह मोहिते पाटील - लोकसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून थेट शरद पवारांना शह दिला. मात्र अध्याप योग्य पुनर्वसन नाही. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र. सोलापूर आणि आसपासच्या परिसरात चांगली संघटनात्मक बांधणी. मुन्ना महाडिक - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने भाजपात प्रवेश. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर महाडिक यांच्या घरात एकही पद नाही. मात्र कोल्हापुरात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. मात्र, भाजपच्या पद्धतीनुसार संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे. या जागांसाठी अनेक नावांची शिफारस राज्याच्या कोअर कमिटीकडून करण्यात आली आहे. याबाबत शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडूनच जाणार केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget